चित्रपट, टीव्ही मालिका, नाटक, वेब सीरिज अशा माध्यमांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या कलाकारांविषयी प्रेक्षक, चाहत्यांना कायमच उत्सुकता असते. कलाकारांबरोबरच त्यांच्या मुलांचीदेखील अनेकदा चर्चा होताना दिसते. जेव्हा आलिया भट्ट आणि रणबीर कपूरने त्यांच्या मुलीचा चेहरा पहिल्यांदा दाखवला होता, त्यावेळी ती कोणासारखी दिसते यावरून मोठ्या प्रमाणात चर्चा झाल्याचे दिसून आले. आता करिश्मा कपूरने तिचे आजोबा राज कपूर, करिनाचा मुलगा तैमूर व रणबीर-आलियाची मुलगी राहा यांच्यात एक साम्य असल्याचे म्हटले आहे.

करिश्मा कपूर आणि करीना कपूर खान यांनी नुकतीच ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी करिश्मा कपूर ही राज कपूर यांची लाडकी नात होती, असे म्हणत त्यामागचे कारणदेखील करीनाने सांगितले आहे.

काय म्हणाली अभिनेत्री?

कपिलबरोबर बोलताना करीनाने म्हटले, “करिश्मा कायमच आजोबांची लाडकी नात होती, कारण- तिच्या डोळ्यांचा रंग आजोबांच्या डोळ्यांच्या रंगासारखा आहे. त्यांचे निळ्या रंगाचे डोळे होते. तसेच ती घरातील पहिली नात होती आणि त्यामुळे ते खूप खूश होते.”

करिश्माने म्हटले, “महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, माझ्यानंतर आता तैमूर आणि राहाचेदेखील डोळे तसेच आहेत. आमच्या तिघांच्याही डोळ्यांचा रंग आजोबांच्या डोळ्यांच्या रंगासारखाच आहे.”

राज कपूर यांच्यासाठी करिश्माच्या डोळ्यांचा रंग खूप महत्त्वाचा होता. राज कपूर यांना पहिली नात झाल्यावर ते दवाखान्यात यासाठी यायचे की, बाळाच्या डोळ्यांचा रंग हा निळा होता. ही गोष्ट त्यांनी करीना आणि करिश्माची आई बबिता यांना सांगितली होती. ‘राज कपूर : द वन अ‍ॅण्ड ओनली शोमॅन’ (Raj Kapoor: The One And Only Showman) या राज कपूर यांची मुलगी रितू नंदा यांनी लिहिलेल्या पुस्तकात बबिता यांनी सांगितलेल्या आठवणीचा उल्लेख आहे. बबिता यांनी सांगितले, “ज्या दिवशी लोलोचा जन्म झाला, तो दिवस आजही मला आठवतो. ब्रीच कॅण्डी हॉस्पिलटलमध्ये फक्त माझे सासरे सोडून संपूर्ण कुटुंब माझ्याबरोबर होते. त्यांनी म्हटले होते की, जर बाळाचे डोळे निळे असतील, तरच मी दवाखान्यात येईन. देवाची कृपा होती की, लोलोचे डोळे अगदी माझ्या सासऱ्यांसारखेच होते.” करिश्मा कपूरला लोलो या टोपणनावाने संबोधले जाते. करीना आणि करिश्मा या रणधीर कपूर आणि बबिता यांच्या मुली आहेत.

हेही वाचा: ‘बिग बॉस मराठी’च्या घरात जान्हवी किल्लेकर घेऊन गेली होती ‘इतके’ कपडे, म्हणाली, “दुसऱ्यांनी डिझाइन केलेले मला आवडत नाही”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता राहा, तैमूर, जेह यांचादेखील चाहतावर्ग निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.