आता लवकरच २०२३ हे वर्ष सुरू होणार आहे. त्यानिमित्त सर्वत्र आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. कोणी न्यू इयर पार्टीचा प्लॅनिंग करण्याच्या तयारीत आहे तर कोणी नवीन वर्षाचे नवे संकल्प करण्याच्या मागे आहे. बॉलिवूड कलाकारही यात मागे नाहीत. अभिनेत्री करीना कपूर हिने आता नवीन वर्षातील तिच्या प्लॅन्सबद्दल भाष्य केलं आहे.

करीना कपूर सध्या तिच्या कुटुंबीयांबरोबर स्विझर्लंडमध्ये व्हेकेशनचा आनंद उपभोगतेय. या ट्रिपदरम्यानचे त्यांचे काही फोटोही तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. २०२२ ला निरोप देताना २०२३ चांगलं जावं यासाठीही तिने काही संकल्प केले आहेत. करीनाने नुकतीच एक मुलाखत दिली. मुलाखतीत तिने तिच्या करिअरच्या प्रवासाबद्दल सांगितलं, तसंच नवीन वर्षाचे संकल्पही शेअर केले.

आणखी वाचा : सलमान खानची ‘बिग बॉस १६’च्या फिनालेमधून एग्झिट? ‘हा’ कलाकार सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चा

ती म्हणाली, “कपूर कुटुंबातील प्रत्येकजण कलाकार आहे पण प्रत्येकाचा प्रवास वेगवेगळा आहे. जसं माझे वडील रणधीर कपूर आणि काका ऋषी कपूर यांचा इंडस्ट्रीतला प्रवास खूप वेगळा आहे, तसाच माझा आणि माझी बहिण करिष्माचाही प्रवास वेगळा आहे. आमच्या कुटुंबातील प्रत्येकाने आपापला मार्ग निवडला आणि यश मिळवून दाखवलं. अशा कुटुंबाचा मी भाग आहे याचा मला कायम अभिमान आहे.”

हेही वाचा : चित्रपटांनंतर आता वाटचाल वेब सीरिजकडे…’या’ प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पुढील वर्षी करणार ओटीटीवर पदार्पण

पुढे नवीन वर्षांच्या संकल्पांबद्दल ती म्हणाली, “२०२३ मध्ये मला गोष्टींमध्ये समातोल साधायला शिकायचंय. याचं कारण म्हणजे, जेव्हा तुम्हाला दोन मुलं असतात आणि तुम्हाला कामही करायचं असतं तेव्हा अनेकदा तारांबळ उडते. एका पायावर उभं राहून आपण आपलं शरीर बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा जशी कसरत होते तशीच कसरत मुलांना सांभाळून काम करताना होते. तसंच नवीन वर्षात जास्तीत जास्त वेळ माझ्या आई-वडिलांसोबत घालवायचा आहे, आणखीन आनंदी राहण्याचा मी प्रयत्न करणार आहे. प्रत्येकजण नवीन वर्षात काही ना काही मोठं करून दाखवण्याचा संकल्प करतो पण प्रत्येकाने आनंदी आणि समाधानी राहण्याचा संकल्प केला पाहिजे असं मला वाटतं.”