बॉलिवूडची बेबो करीना कपूर खान आणि पती सैफ अली खान यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. करीना ही नेहमी फार बिनधास्तपणे तिचे मत व्यक्त करताना दिसते. ती तिचे वैयक्तिक आयुष्य आणि प्रोफेशनल करिअर याबद्दल कायमच स्पष्टपणे मत मांडताना दिसते. नुकतंच तिने लग्नानंतर सिनेसृष्टीत काम करण्याबद्दल खुलासा केला आहे.

करीनाने २०१२ मध्ये बॉलिवू़ड अभिनेता सैफ अली खान बरोबर लग्न केले. २०१६ साली करीनाने तैमूरला जन्म दिला. तर २०२१ मध्ये करीनाने दुसऱ्या मुलाला जन्म दिला असून त्यांनी त्याचे नाव ‘जहांगीर’ ठेवले आहे. नुकतंच करीनाने लग्नानंतर अभिनेत्रींच्या करिअरबद्दल भाष्य केले आहे.
आणखी वाचा : तिसऱ्यांदा गरोदर असल्याच्या चर्चांवर करीना कपूरचे स्पष्टीकरण, म्हणाली “सैफने आधीच…”

“पूर्वी लग्न करणं ही एखाद्या अभिनेत्रीसाठी मोठी गोष्ट मानली जायची. पण आता काळानुसार सर्व काही बदललं आहे. तुम्हाला तुमच्या वयाचा अभिमान असायला हवा. आज महिला धाडसी झाल्या आहेत. त्या धाडसी निर्णय घेत आहेत. आता तुमच्या वैवाहिक जीवनाचा तुमच्या करिअरवर कोणताही परिणाम होत नाही. आता अनेक चित्रपट निर्माते जोखीम पत्करून वेगवेगळ्या लोकांना संधी देत आहेत. अनेक ​​ऑफबीट स्क्रिप्टवर काम करत आहेत. अनेक संधीही निर्माण होताना दिसत आहेत.

तुमचे वर्क लाईफ बॅलन्स करण्यासाठी कोणताही फॉर्म्युला किंवा काही सिक्रेट नाही. तुम्हाला तुमचे आयुष्य कसं जगायचं हे ठरवायचं आहे. मला काय करायचे आहे आणि काय नाही, हे तुम्हालाच ठरवायचे आहे. जेव्हा मला एखाद्या गोष्टी करायच्या नसतात, तेव्हा मी त्याला स्पष्टपणे नकार देते.

जेव्हा मला माझ्या मुलांना एकटे सोडायचे नसते किंवा अवॉर्ड शोमध्ये जायचे नसते, तेव्हा मी त्याला स्पष्ट नकार देते. मी माझ्या आवडीनिवडी ठरवल्या आहेत. मी माझ्या पतीबरोबर घरी बसून एखादा शो पाहते किंवा कधी कधी एक ग्लास वाइन पिते, हे मला जास्त आवडते. मी वैयक्तिकरित्या अनुभव घेत असलेल्या सर्वात मोठ्या बदलांपैकी हा एक आहे. वर्क लाईफचा बॅलन्स करणे या गोष्टी माझ्या स्वत:वर अवलंबून आहेत.” असे करीनाने म्हटले.

आणखी वाचा : क्रांती रेडकरला मराठी सिनेसृष्टीतील ‘या’ अभिनेत्याबरोबर जायचं डेटवर, म्हणाली “तो कामात…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान करीना ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने आतापर्यंत थ्री इडियट्स, बजरंगी भाईजान, जब वी मेट असे अनेक चित्रपट केले आहेत. सध्या ती तिच्या आगामी ‘द क्रू’ या चित्रपटात काम करत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत तब्बू आणि क्रिती सेनॉन दिसणार आहेत.