Tu Meri Main Tera Main Tera Tu Meri Movie : अभिनेता कार्तिक आर्यन व अनन्या पांडे त्यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. ‘तू मेरी मैं तेरा, मैं तेरा तू मेरी’ या चित्रपटातून ही जोडी लवकरच झळकणार आहे. सध्या या चित्रपटाचं क्रोएशिया इथे चित्रीकरण सुरू आहे. अशातच या दोघांचे चित्रपटाच्या सेटवरील फोटो लिक झाले आहेत.

‘तू मेरी मैं तेरा, मैं तेरा तू मेरी’ या चित्रपटाच्या सेटवरील अनन्या व कार्तिक यांचे फोटो लिक झाले असून या चित्रपटातील त्यांचा लूक समोर आला आहे. ‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार समोर आलेल्या फोटोमध्ये अनन्या पांडेचा लूक हा या चित्रपटाच्या पोस्टरवर असलेल्या लूकपेक्षा खूप वेगळा आहे. यामध्ये तिच्या केसांचा रंगही नेहमीपेक्षा वेगळा असून केसांना हायलाइट करण्यात आलं आहे.

कार्तिक व अनन्या यांच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोंखाली त्यांच्या चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. या फोटोवर एका नेटकऱ्याने, ‘मी युरोपमध्येच राहतो पण मी कधीही कोणाला फिकट रंगाचे कपडे परिधान केलेले किंवा इतके मोठे कानातले घालताना पाहिलेलं नाही’, तर दुसऱ्या नेटकऱ्याने, ‘त्यांनी इबेरियन टॅन्ड लूक केला आहे. इटली आणि स्पेन येथील महिला अनेकदा अशा लूकमध्ये पाहायला मिळतात.’ कार्तिक आर्यनने नुकताच क्रोएशिया येथील चित्रीकरण संपल्यानंतरचा एक व्हिडीओ शेअर केला होता, यामध्ये तो अनन्यासह ‘धीमे धीमे’वरील स्टेप्स करताना दिसला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘तू मेरी मैं तेरा, मैं तेरा तू मेरी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन मराठमोळे दिग्दर्शक समीर विद्वंस करत आहेत. या चित्रपटाची कथा करण शर्मा यांनी लिहिली आहे, तर चित्रपटाची निर्मिती करण जोहरच्या ‘धर्मा प्रोडक्शन’ने केली आहे. समीर विद्वंस यांनी यापूर्वी कार्तिक आर्यन कियारा अडवाणी यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘सत्य प्रेम की कथा’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. यानंतर आता पुन्हा एकदा कार्तिक आर्यन त्यांच्या चित्रपटातून मुख्य भूमिकेत झळकणार आहे.