कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी सध्या त्यांचा आगामी चित्रपट ‘सत्य प्रेम की कथा’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, या चित्रपटाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. निर्मात्यांनी चित्रपटाच्या एका गाण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे. ही रक्कम कियारा अडवाणीच्या मानधनापेक्षाही मोठी असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा- बंगल्याबाहेर अनवाणी पायांनी चाहत्यांची भेट का घेतात अमिताभ बच्चन? पहिल्यांदाच खुलासा करत म्हणाले…

मीडिया रिपोर्ट्सनुसार, निर्मात्यांनी फक्त एका गाण्यासाठी जवळपास, ७ कोटी रुपये खर्च केले आहेत. हे गाणं इंट्रोडक्टरी असून एका वेडिंग थीमवर आधारित असल्याचं सांगितलं जात आहे. या गाण्यात एकूण चार पद्धतीने लग्न दाखवण्यात येणार असून त्यामध्ये चार वेगळे सेट उभारले जाणार आहेत. चार पद्धतींच्या लग्नात साऊथ इंडियन, मुस्लीम, गुजराती आणि ख्रिश्चन पद्धतीने ते केले जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. या गाण्यासाठी चार सेट लावण्यात आल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. दोन लग्नाचे सेट मढ बेटावर उभारण्यात आले होते तर मालाड येथील स्टुडिओमध्ये दोन लग्नाचे सेट उभारण्यात आले होते, असं सांगण्यात येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कार्तिक व कियाराची जोडी यापूर्वी ‘भूलभुलैया २’ मध्ये दिसली होती. तेव्हा प्रेक्षकांना या दोघांची केमिस्ट्री खूप आवडली होती. त्यानंतर पुन्हा एकदा कार्तिक व कियारा सत्यप्रेम व कथा म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. हा चित्रपट २९ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये गजराज राव व सुप्रिया पाठक कार्तिकच्या पालकांच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन मराठमोळ्या समीर विद्वांसने केलं आहे.