बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘भूल भूलैया ३’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. आता अलीकडेच अभिनेत्याने त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. कार्तिकने एक नवीन आलिशान अशी रेंज रोव्हर एसयुव्ही खरेदी केली आहे, ज्याची किंमत ६ कोटी रुपये आहे. परंतु कार खरेदी केल्यानंतर, अभिनेता आता सायकल चालवताना दिसला आहे, यावर चाहत्यांनी अभिनेत्याला काही धमाल प्रश्नदेखील विचारले आहेत.

कार्तिकने नुकतंच एक रील शेअर केलं आहे, ज्यामध्ये तो सायकल चालवताना दिसत आहे. त्यानंतर त्याने या रीलवर आलेल्या चाहत्यांच्या काही कमेंट्सना उत्तरही दिले. जेव्हा चाहत्यांनी अभिनेत्याला ६ कोटी रुपयांची नवीन कार खरेदी केल्यानंतरही सायकल का चालवत आहे असे विचारले. तेव्हा कार्तिकने त्याला भन्नाट उत्तर दिले आहे.

आणखी वाचा : मनोज बाजपेयींच्या ‘जोरम’ चित्रपटाचे दिग्दर्शक घराचं भाडंदेखील भरण्यास असमर्थ; देवाशिष माखिजा यांनी व्यक्त केली खंत

कार्तिकने हे रील त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “आता मी सायकलवरून सेटवर जाण्याचा विचार करत आहे.” अभिनेत्याच्या या रीलवर टिप्पणी करताना एका यूजरने म्हटले की, “मला तुझी ६ कोटी रुपयांची कार दे.” या कमेंटवर कार्तिकने मजेशीर उत्तर दिले आणि म्हणाला, “मी दुसऱ्या एका मित्राला वापरायला दिली आहे… ती परत आल्यावर सांगेन.” आणखी एका युजरने लिहिले की, ‘सोन्याच्या महालात राहायला गेला तरी असं का वागतोयस?” यावर अभिनेत्याने उत्तर देत सांगितले, “जुन्या सवयी लवकर सुटत नाहीत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर कार्तिक आर्यन ‘भूल भूलैया ३’ मध्ये मंजुलिका म्हणजेच विद्या बालनसोबत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी कार्तिकने विद्या बालन आणि तृप्ती डिमरी यांचे या चित्रपटाच्या युनिटमध्ये स्वागत केले. विद्या बालनने काही दिवसांपूर्वी शूटिंग करताना सेटवरील एक व्हिडिओही शेअर केला होता, ज्यामध्ये तिच्यासोबत तृप्ती आणि कार्तिक दिसत होते. अनीस बज्मी दिग्दर्शित हा चित्रपट यंदाच्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे.