कार्तिक आर्यन हे नाव सध्या चांगलंच चर्चेत आहे. सध्या त्याच्या आगामी ‘शेहजादा’ चित्रपटाची चर्चा आहे. कार्तिकच्या वाढदिवसाला या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला. सोशल मीडियावर सध्या याच टीझरची चर्चा आहे. हा चित्रपट तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या २०२० च्या ‘आला वैकुंठपुरमुल्लो’ या दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख आता पुढे ढकलण्यात आली आहे.

बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान ‘पठाण’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. आता या चित्रपटाला तूफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटाचे सर्वच शोज हाऊसफुल होताना दिसत आहेत. ‘पठाण’ चित्रपटाला सर्वत्र उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत भारतातून २८२ कोटी तर जगभरातून ५०० कोटींहून अधिक गल्ला जमवला आहे. म्हणूनच ‘शेहजादा’ चित्रपटाचा स्टार कार्तिक आर्यन आणि निर्मात्याने शाहरुख खानचा मान ठेवत आपल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांच्यावर हल्ला; कॉन्सर्टमध्ये गाताना घडली घटना

शेहजादा चित्रपटाच्या निर्मात्यांनी बॉलिवूड हंगामाशी प्रतिक्रिया देताना असं सांगितलं की, “१० फेब्रुवारी रोजी चित्रपट प्रदर्शित करण्यात काहीच अर्थ नाही कारण पठाण रेकॉर्डब्रेक कमाईमुळे तो चर्चेत राहील त्यामुळे एक आठवड्यानंतर प्रदर्शित केल्याने हे व्यावसायिक दृष्ट्या फायद्याचे ठरेल. त्यामुळे दोन्ही चित्रपट चांगली कमाई करतील आणि प्रेक्षकांनादेखील थोडा अवधी मिळेल.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या चित्रपटाची दिग्दर्शन रोहित धवन करत असून, कार्तिकबरोबर क्रिती सॅनॉन, परेश रावल, मनीषा कोइरालासारखे कलाकारही यामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. १० फेब्रुवारीला प्रदर्शित होणारा चित्रपट त्याच्या पुढच्या आठवड्यात म्हणजे १७ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होईल .