बॉलिवूडमध्ये गेल्या काही वर्षांपासून विनोदी भयपट या शैलीतील चित्रपट तयार करण्याचे प्रमाण वाढले आहे. या पठडीतल्या चित्रपटांमध्ये भय आणि विनोद या दोन्हींचा संगम असल्याने प्रेक्षक असे चित्रपट पाहणे पसंत करतात. मे २०२२ मध्ये प्रदर्शित झालेला ‘भूल भुलैया २’ हा विनोदी भयपट खूप चालला. करोना असूनही या चित्रपटाने १८० कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले. या चित्रपटाद्वारे अक्षय कुमारचा भूल भुलैयाचा वारसा अभिनेता कार्तिक आर्यनने पुढे चालवला. दरम्यान या चित्रपटशैलीतला आणखी एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

कतरिना कैफ, सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर यांचा ‘फोन भूत’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्यांनी कॉफी विथ करण या कार्यक्रमाला देखील हजेरी लावली होती. लग्नानंतरचा पहिला चित्रपट असल्याने ‘फोन भूत’ कतरिनासाठी खूप खास आहे. गेल्या आठवड्यामध्ये या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले होते. पोस्टर प्रदर्शनानंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळाला.

आणखी वाचा – “साजिद खानला ‘बिग बॉस’मधून काढून टाका”; महिला आयोगाच्या अध्यक्षाची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी

नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटामध्ये कतरिना भूताच्या रुपात दिसणार आहे, तर सिद्धांत आणि ईशान हे भूत पकडणाऱ्या मॉर्डन तांत्रिकाच्या भूमिकेत आहेत. कतरिनाला अन्य भूतांना मोक्षप्राप्तीसाठी मदत करायची असते. यासाठी ती सिद्धांत-ईशानसह भूत पकडणारी टोळी बनवून एका अनोख्या प्रवासाला निघते. ट्रेलरवरुन या चित्रपटामध्ये जॅकी श्रॉफ यांनी खलनायकाचे पात्र साकारत असल्याचे लक्षात येते. ‘हकीकत’ आणि ‘कोई मिल गया’ अशा काही चित्रपटाचा संदर्भ देत विनोदनिर्मिती करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अडीच मिनिटाच्या हा धमाल ट्रेलर पाहिल्यानंतर मनामध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण होते.

आणखी वाचा – Viral Video : बोलता बोलता तिने विजय वर्माला चपलेने मारलं अन्…; अभिनेत्याची प्रतिक्रिया चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शीबा चढ्ढा, निधी बिश्त, मनु ऋषी चढ्ढा गुरमीत सिंग असे गुणी कलाकार या चित्रपटामध्ये सहाय्यक व्यक्तिरेखा साकारणार आहेत. गुरमीत सिंग दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती फरहान अख्तरच्या एक्सेल एंटरटेनमेंटद्वारे करण्यात आली आहे. ‘फोन भूत’ हा चित्रपट ४ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.