चित्रपटसृष्टीतील नावाजलेले अभिनेते मनोज बाजपेयी हे विविध कारणांमुळे चर्चेत असतात. दर्जेदार अभिनयाने मनोज यांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. ‘सत्या’मधला भिकु म्हात्रे ते ‘गँग्स ऑफ वासेपूर’मधील सरदार खान अशा वेगवेगळ्या भूमिका त्यांनी अजरामर केल्या आहेत. ‘राजनीती’ चित्रपटातील त्यांची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. या चित्रपटात त्यांच्याबरोबर मोठी स्टारकास्ट होती. एका मुलाखतीत मनोज बाजपेयी यांनी या चित्रपटाच्या प्रीमिअरदरम्यान घडलेला एक किस्सा सांगितला आहे. हा किस्सा अभिनेत्री कतरिना कैफशी निगडित आहे.

रजत शर्माच्या ‘आपकी अदालत’मध्ये मनोज बाजपेयींनी हा किस्सा सांगितला आहे. २०१० मध्ये, प्रकाश झा यांच्या ‘राजनीती’ चित्रपटाच्या प्रीमियरच्या वेळी मनोज बाजपेयी चित्रपटातील कलाकारांबरोबर फोटो काढत होते. तेव्हा कतरिना मनोज बाजपेयी यांच्या जवळ गेली आणि त्यांच्या पायाला स्पर्श करून म्हणाली, ‘तुम्ही एक अद्भुत अभिनेता आहात.’ कतरिनाच्या या कृतीमुळे मनोज बाजपेयी ओशाळले आणि त्यांनी तिली मिठी मारली.

१९९८ मध्ये ‘सत्या’ चित्रपट रिलीज झाल्यानंतर मनोज बाजपेयींनाही असाच अनुभव आला होता. त्यावेळी अभिनेत्री तब्बूही त्यांच्या पाया पडली होती. मनोज बाजपेयी म्हणाले, “तब्बूने ‘सत्या’ला पाहिले आणि ती सेटवर आली. तिने सर्वांसमोर माझ्या पायाला स्पर्श केला. माझे कौतुक करण्याचा हा तिचा मार्ग होता.”

हेही वाचा- विकी कौशलने उडवली साराची खिल्ली, अभिनेत्रीची शायरी ऐकून म्हणाला, “मला इथून पुढे…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मनोज बाजपेयी यांचा ‘सिर्फ एक बंदा काफी है’ हा चित्रपट लवकरच ‘झी ५’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांना प्रथमच मनोज यांना एका वकिलाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. याबरोबरच मनोज यांच्या ‘द फॅमिलीमॅन’ सीझन-३ ची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत.