बॉलीवूड अभिनेता विकी कौशल त्याच्या ‘जरा हटके जरा बचके’ या नव्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. या ट्रेलरला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. ट्रेलर लॉन्च कार्यक्रमादरम्यान विकी कौशलने त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टी शेअर केल्या.

हेही वाचा- शाहरुख नव्हे तर ‘हा’ अभिनेता साकारणार ‘डॉन ३’मध्ये मुख्य भूमिका; प्रसिद्ध समीक्षकाचा खुलासा

ट्रेलर लाँचदरम्यान विकी कौशलने सांगितले की, कतरिना कैफसोबत त्याची घरातील फर्निचरबाबत बरीच चर्चा झाली आहे. तो म्हणाला, कतरिनाला आम्ही घरी बार लावावा अशी इच्छा आहे. तिने मला याबाबत सांगितले. मात्र, त्या बारची किंमत ऐकून मी थक्क झालो. मी म्हणालो की, मी स्वतः ताट घेऊन उभा राहीन, पण बार घरी येणार नाही.

हेही वाचा- गर्लफ्रेण्ड सबाबरोबर राहण्यासाठी हृतिक रोशननं खरेदी केलं शंभर कोटींचं घर? अभिनेत्याने केला खुलासा, म्हणाला…

विकीने पुढे सांगितले की, “त्या बारची किंमत इतकी जास्त होती की, आकडा ऐकून मला धक्काच बसला. मी सरळ कतरीनाला म्हणालो, हा बार खूप महाग आहे. याची किंमत माझ्या एका चित्रपटाच्या फीइतकी आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विकी कौशलचा आगामी चित्रपट ‘जरा हटके जरा बचके’ हा एक रोमँटिक फॅमिली ड्रामा चित्रपट आहे. ज्यामध्ये त्याच्यासोबत सारा अली खानदेखील दिसणार आहे. हा चित्रपट २ जून २०२३ रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. तर कतरीना कैफ लवकरच ‘टायगर ३’ मध्ये दिसणार आहे. यामध्ये तिच्याबरोबर सलमान खान मुख्य भूमिकेत आहे.