बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांचा ‘ये जवानी है दीवानी’ चित्रपट चांगलाच गाजला होता. ३० मे २०१३ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला १० वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र, अजूनही या चित्रपटावरील प्रेक्षकांचे प्रेम कणभरही कमी झाले नाही. चित्रपटात दीपिका पादूकोनने साकारलेले नैना पात्र प्रेक्षकांना चांगलेच आवडले होते. मात्र, नैना पात्रासाठी दीपिका अगोदर दुसऱ्या अभिनेत्रीला विचारणा करण्यात आली होती. मात्र, ऐनवेळी त्या अभिनेत्रीने नकार दिला आणि या चित्रपटात दीपिकाची वर्णी लागली. पण ती अभिनेत्री नेमकी कोण तुम्हाला माहिती आहे का?

टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, दीपिकाच्या आधी करण जोहर आणि अयान मुखर्जी यांनी नैनाची मुख्य भूमिका साकारण्यासाठी कतरिना कैफशी संपर्क साधला होता. या चित्रपटासाठी कतरिनाला फायनलही करण्यात आले. चर्चेनंतर शुटींगच्या तारखाही ठरल्या. पण अचानक कतरिनाने चित्रपट करण्यास नकार दिला.

हेही वाचा- खऱ्या आयुष्यात विकी कौशलने कतरिनाचा मार खाल्लाय का? कपिल शर्माचा प्रश्न ऐकताच अभिनेता म्हणाला….

कतरिनाला त्यावेळी यशराज चित्रपटाच्या ‘धूम ३’ ची ऑफर आली होती. मात्र, ‘धूम ३’ आणि ‘ये जवानी है दिवानी’च्या तारखां सारख्या होत्या. कतरिनाने यापूर्वी कधीही आमिर खानसोबत काम केले नव्हते, त्यामुळे खूप विचार करून कतरिनाने ‘धूम ३’ चित्रपटाला होकार दिला आणि ‘ये जवानी है दिवानी’ला नकार दिला.

हेही वाचा- “माझ्या हृदयाचा तुकडा…” दीपिका पदुकोणने रणबीर कपूरचा फोटो केला शेअर, पोस्ट चर्चेत

२०१३ मध्ये सुपरहिट ठरलेल्या ‘ये जवानी है दिवानी’ चित्रपटाला दहा वर्षं पूर्ण झाल्याने, ‘धर्मा मूव्हीज’ने रणबीर कपूरने साकारलेल्या ‘बनी’ या पात्राच्या डायलॉगचा खास व्हिडीओ शेअर केला आहे. यान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटात रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. याशिवाय आदित्य रॉय कपूर आणि कल्की कोचलीन हे दोघेसुद्धा चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. व्हिडीओबरोबर “जहाँ है वहीं का मजा लेते है…” या लोकप्रिय डायलॉगचे पोस्टसुद्धा ‘धर्मा मूव्हीज’ने शेअर केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘धर्मा मूव्हीज’ने शेअर केलेल्या या व्हिडीओवर ‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटाच्या चाहत्यांनी असंख्य कमेंट करीत “याचा दुसरा भाग लवकरात लवकर बनवा किंवा हाच चित्रपट पुन्हा रिलीज करा” अशी मागणी केली आहे. एका युजरने कमेंट करीत “माझ्या बालपणातील सर्वात आवडता चित्रपट” असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने युजरने “या चित्रपटाने मला मैत्री, प्रेम, आपल्या पालकांविषयीचे प्रेम सर्वकाही शिकवले,” अशी प्रतिक्रिया दिली आहे.