‘कौन बनेगा करोडपती’ कार्यक्रम विविध कारणांनी नेहमीच चर्चेत असतो. बॉलीवूडचे सुपस्टार अमिताभ बच्चन या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहेत. सध्या या कार्यक्रमाचे १५ वे पर्व सुरू आहे. या कार्यक्रमात अनेकदा अमिताभ आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत खुलासे करताना दिसतात. आता नुकतंच त्यांनी त्यांची दोन्ही मुलं श्वेता आणि अभिषेकबाबत एक खुलासा केला आहे.

हेही वाचा- “मी त्याच्याबरोबर बसून…”, घटस्फोटाच्या १३ वर्षांनी प्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केली पूर्वाश्रमीच्या पतीला भेटायची इच्छा

आकाश पाटीदार हा स्पर्धक हॉटसीटवर बसला होता. मध्य प्रदेशातून आलेला आकाश विद्यार्थी आहे. यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करण्याचं आकाशचं स्वप्न आहे. हॉटसीटवर बसल्यानंतर आकाशने अमिताभ बच्चन यांच्याबरोबर आपली बकेट लिस्ट शेअर केली. आकाश म्हणाला, “मला स्काय डायव्हिंगला जायचे आहे. जेव्हा मी कॅनडामध्ये इंटर्नशिप करत होतो, तेव्हा मला एकदा याची संधीही मिळाली, पण आईने मला जाऊ दिले नाही.”

आकाशची ही इच्छा ऐकताच अमिताभ बच्चन यांनी आकाशच्या आईला पाठिंबा दिला. म्हणाले, ‘पुढच्या वेळी आकाश स्काय डायव्हिंगच्या परवानगीसाठी आला तर त्याला अजिबात परवानगी देऊ नका. मी देखील एक वडील आहे आणि जेव्हा माझी मुले अभिषेक आणि श्वेता माझ्याकडे परवानगीसाठी आली होती, तेव्हा मी त्यांना परवानगी दिली नव्हती. हे भयानक आणि धोकादायक आहे, याची मला नेहमी भीती वाटते.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमिताभ पुढे म्हणाले, “अभिषेक आणि श्वेता यांनी तिथे सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतली जाते आणि संपूर्ण प्रशिक्षण दिले जाते असं सगळं सांगितलं. पण, पॅराशूट वेळेवर उघडले नाही तर काय? मुद्दाम कोणताही धोका कशाला पत्करायचा. उडी मारायचीच असेल तर समुद्रात मारा आणि मासे शोधा, आकाशात कशाला जायचे.”