मनोरंजन विश्वात सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. एकामागोमाग एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. नुकतंच अथिया शेट्टी व के.एल.राहुलने लग्नगाठ बांधली. आता सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणीची लगीनघाई सुरू आहे. कियारा-सिद्धार्थ ६ फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकणर आहेत.

कियारा-सिद्धार्थच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे. आजतकने दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ-कियाराचा शाही विवाहसोहळा जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसवर पार पडणार आहे. लग्नासाठी १०० ते १२५ लोकांना निमंत्रण दिलं गेलं आहे. सिद्धार्थ-कियाराच्या लग्नात बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, करण जौहर व वरुण धवन यांना लग्नाचं निमंत्रण देण्यात आलं आहे.

हेही वाचा>> वनिता खरातची लगीन घटिका समीप; अभिनेत्रीने शेअर केला हिरवा चुडा भरलेला फोटो

हेही वाचा>> आसाराम बापूच्या जन्मठेपेच्या शिक्षेवर उर्फी जावेदची प्रतिक्रिया, म्हणाली “या माणसाला…”

मीडिया रिपोर्टनुसार, कियारा-सिद्धार्थच्या लग्नासाठी सूर्यगढ पॅलेसवरील लक्झरी व्हिला बुक करण्यात आला आहे. या व्हिलामध्ये तब्बल ८४ खोल्यांचं बुकिंग करण्यात आलं आहे. तर पाहुण्यांसाठी ७० गाड्याही बुक करण्यात आल्या आहेत. सूर्यगढ पॅलेसवरील एका दिवसाचं भाडं एक ते दोन कोटींच्या घरात आहे. ५ फेब्रुवारीपासून कियारा-सिद्धार्थच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे.

हेही वाचा>> शिव ठाकरेला आमदार बच्चू कडूंचा पाठिंबा; ‘बिग बॉस’ स्टारचा पान टपरीवरील ‘तो’ फोटो शेअर करत म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिद्धार्थ-कियारा अनेक दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. आता ते विवाहबंधनात अडकून नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहे.