बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी व अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा लवकरच आई-बाबा होणार आहेत. या जोडीनं फेब्रुवारी महिन्यात ही आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली होती. त्यानंतर अभिनेत्री कान्स ‘फिल्म फेस्टिवल’मध्येही झळकली. यावेळी कियाराच्या लूकचं अनेकांकडून कौतुक करण्यात आलं. अशातच आता अभिनेत्री नवीन भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. नुकताच ‘वॉर २’चा टीझर प्रदर्शित झाला असून, त्यामध्ये हृतिक रोशन व ज्युनियर एनटीआरसह कियारा अडवाणीही झळकणार आहे. चित्रपटातून पहिल्यांदाच कियारा व हृतिक यांच्यातील केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे.

दाक्षिणात्य अभिनेता ज्युनियर एनटीआर व हृतिक रोशनची मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘वॉर २’ची अनेक दिवसांपासून चर्चा होती. अशातच आज ज्युनियर एनटीआरच्या वाढदिवसानिमित्त या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. टीझरमध्ये हृतिक रोशन व ज्युनियर एनटीआर यांच्यासह अभिनेत्री कियारा अडवाणी पाहायला मिळत आहे. तर त्यामध्ये कियारा बोल्ड लूकमध्ये दिसत आहे. टीझरमध्ये कियाराने हिरव्या रंगाची बिकिनी परिधान केली असून, तिच्या या बोल्ड लूकने लक्ष वेधले आहे. सोशल मीडियावर कलाकारांसह टीझरचीही चर्चा होत आहे.

आर्यन मुखर्जी दिग्दर्शित ‘वॉर २’ हा चित्रपट १४ ऑगस्टला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी ‘वॉर’ चित्रपटात हृतिक रोशनसह अभिनेता टायगर श्रॉफ झळकला होता. हृतिक व टायगरसह यामध्ये वाणी कपूर, आशुतोष राणा, सोनी राजदान यांसारखे कलाकार झळकले होते. तर ‘वॉर २’मध्ये टायगर नसून हृतिक रोशनसह ज्युनियर एनटीआर पाहायला मिळणार आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘वॉर’ चित्रपट २०१९ साली प्रदर्शित झाला होता. यशराज फिल्म्स निर्मित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ४७५.६२ कोटींचा गल्ला जमवला होता.

‘वॉर २’चा टीझर प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी कमेंट्स करीत सोशल मीडियावरून टीझरचं कौतुक केलं आहे. १४ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांत ‘वॉर २’ हिंदी, तेलुगू व तमीळ भाषेत प्रदर्शित होणार आहे. हृतिक रोशन, ज्युनियर एनटीआर व कियारा अडवाणी हे तिघे पहिल्यांदाच एकत्र काम करीत आहेत. त्यामुळे या त्रिकुटाला एकत्र मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुक्ता आहे. या तिघांव्यतिरिक्त या चित्रपटात जॉन अब्राहम, शबीर अहलुवालिया हे कलाकारही झळकणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, कियारा अडवाणीच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ती पहिल्यांदाच ज्युनियर एनटीआर व हृतिक रोशनसह मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. यापूर्वी ती ‘एम. एस. धोनी द अनटोल्ड स्टोरी,’ ‘कबीर सिंह,’ ‘शेरशाह,’ ‘गुड न्यूज,’ ‘शेरशाह,’ ‘भूल भुलैया,’ ‘सत्य प्रेम की कथा,’ ‘गेम चेंजर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकली आहे. तिनं आजवर अनेक बड्या कलाकारांबरोबर काम केलं आहे. आता कियारा लवकरच ‘वॉर २’मध्ये झळकणार आहे