ज्येष्ठ अभिनेत्री आणि भाजपा नेत्या किरण खेर या अभिनेते अनुपम खेर यांच्या पत्नी आहेत. बऱ्याच जणांना माहीत नाही की किरण यांनी अनुपम यांच्याशी दुसरं लग्न केलं होतं. त्यांचं पहिलं लग्न एका उद्योगपतीशी झालं होतं. इतकंच नव्हे तर त्यांचा मुलगा सिकंदर खेर हा पहिल्या पतीपासून झाला होता. अनुपम व किरण यांना अपत्य नाही. अनुपम यांनी सिंकदरला स्वतःचं नाव दिलं. आज किरण खेर यांच्या पहिल्या पतीबद्दल जाणून घेऊयात.

हेही वाचा – “आमचं नातं लोकांसाठी…”, विजय वर्माबरोबर प्रेमाची कबुली दिल्यानंतर सुरू असलेल्या चर्चांवर तमन्ना भाटियाची प्रतिक्रिया

किरण खेर शिकत असतानाच त्यांनी अभिनयात करिअर करण्याचा निर्णय घेतला होता. मनोरंजन विश्वात करिअर करण्याच्या उद्देशानेच त्या मुंबईत आल्या, इथे त्यांची भेट उद्योगपती गौतम बेरी यांच्याशी झाली. गौतम किरण यांना पाहताक्षणीच प्रेमात पडले. त्यानंतर किरण व गौतम यांनी १९७९ मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि लग्नानंतर त्यांचा मुलगा सिकंदरचा जन्म झाला.

हेही वाचा – तमन्ना भाटियाने प्रेमाची कबुली दिल्यानंतर विजय वर्मा म्हणाला, “माझ्या आयुष्यात…”

लग्नाच्या काही वर्षांनंतर किरण आणि गौतम यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला, परिणामी लग्नानंतर सहा वर्षांतच दोघे वेगळे झाले. १९८५ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. तेव्हा सिकंदर फक्त पाच वर्षांचा होता. ‘न्यूज १८ हिंदी’ने दिलेल्या वृत्तानुसार, गौतमपासून घटस्फोट घेतल्यानंतर किरण यांची भेट अनुपम खेर यांच्याशी जाली. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि १९८५ मध्येच त्यांनी लग्न केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनुपम खेर आणि किरण यांना एकही मूल नाही. त्यांनी सिकंदरला एकत्र वाढवलं. तो किरण यांच्या पहिल्या पतीचा मुलगा आहे. इतकंच नाही तर सिकंदरच्या नावापुढे अनुपम खेर यांचंच नाव आहे. दोघांचं नातं खूप घट्ट असून ते एकमेकांशी चांगला बाँड शेअर करतात. दुसरीकडे, लग्नाच्या ३८ वर्षांनंतरही अनुपम व किरण यांचं प्रेम कायम आहे आणि ते दोघेही एकत्र खूप खूश आहेत.