Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Box Office Collection Day 3: सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा बहुप्रतिक्षीत व दमदार स्टारकास्ट असलेला चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्या दिवशी जास्त कमाई केली नव्हती, पण वीकेंडला चित्रपटाने चांगला गल्ला जमवला आहे. शनिवार व रविवारी चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली आहे.

आर्यन खानने निसाला पळवून नेल्यावर काय करशील? काजोलच्या उत्तराने शाहरुख खान झालेला नि:शब्द

फरहाद सामजी दिग्दर्शित ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ १३ कोटींची कमाई केली होती. सलमान खानच्या चित्रपटासाठी ही चांगली ओपनिंग मानली जात नव्हती. पण २२ एप्रिलला ईदची सुट्टी असल्याने चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी थिएटरमध्ये गर्दी केली होती आणि परिणामी चित्रपटाच्या कलेक्शनमध्येही वाढ झाली आणि चित्रपटाने दुसऱ्या २५ कोटींचा व्यवसाय केला. सलमान खाननेही पोस्ट करून चाहत्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आभार मानले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी चित्रपटाच्या कमाईचे प्रारंभिक आकडेही समोर आले आहेत. ‘सॅकनिल्‍क’च्‍या रिपोर्टनुसार, रविवारी या चित्रपटाने २६.२५ कोटींची कमाई केली आहे. यासह ‘किसी का भाई किसी की जान’चे एकूण कलेक्शन आता ६४.२५ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. चित्रपटाने तिसऱ्या दिवशी ५० कोटींचा टप्पा गाठला आहे. आता या चित्रपटाची १०० कोटी रुपयांच्या क्लबमध्ये सामील होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.