कतरिना कैफ बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. आज कतरिनाचा चाळीसावा वाढदिवस आहे. केली अनेक वर्ष सिनेसृष्टीत कार्यरत राहून तिने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट प्रेक्षकांना दिले. तिच्या कामाचं नेहमीच कौतुक होत असतं. पण याच बरोबर तिचा फिटनेस नेहमी लक्ष वेधून घेत असतो.

कतरिना फिटनेस प्रिक आहे. ती रोज तिच्या कामाच्या व्यग्र शेड्युलमधून वेळ काढून न चुकता व्यायाम करते. याचबरोबर ती डाएटही फॉलो करते. याबद्दल ती अनेक मुलाखतींमधून मोकळेपणाने बोलली आहे. याचबरोबर अनेकदा तिने तिचं फिटनेस सिक्रेटही शेअर केलं आहे.

आणखी वाचा : …म्हणून विकी-कतरिनाने लग्नसोहळ्यात मोजक्याच बॉलिवूड स्टार्सना केलं होतं निमंत्रित

स्वतःला फिट ठेवण्यासाठी कतरिना जिममध्ये वर्कआऊट करतेच पण त्याचबरोबर पौष्टिक आहारही घेते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कतरिना तिच्या फिटनेससाठी पिलाटेस, योगा, सायकलिंग, वेट ट्रेनिंग आणि डांस प्रॅक्टिसही करत असते. याशिवाय अभिनेत्री कार्डियो, केटलबेल्स, पावरप्लेटसारखे बरेच व्यायाम करते.

हेही वाचा : “कतरिना वहिनीपेक्षा…,” विकी कौशल व सारा अली खानला सिद्धिविनायकाचं एकत्र दर्शन घेताना पाहून चाहते नाराज

कतरिना रोज सकाळी ४ ग्लास कोमट पाणी पिते. कतरिना मायक्रोबायोटिक डाएट फॉलो करते ज्यामध्ये उकळलेल्या भाज्यांचा समावेश असतो. याशिवाय ती दर दोन तासांनी एक फळ खाते. नाश्त्यात कतरिना दलिया, एग व्हाइट खाते. दुपारच्या जेवणात कतरिना डाळ भात आणि सलाड खाते. तर डिनरमध्ये कतरिना कैफ सूप, उकळलेल्या भाज्या आणि सलाड खाते.