अभिनेता विकी कौशल आणि सारा अली खान सध्या त्यांच्या ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपटामुळे खूप चर्चेत आहेत. गेल्या शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अशातच विकी आणि साराने सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. पण साराबरोबर गणपतीच्या दर्शनाला गेल्याने विकीचे चाहते नाराज झाले आहेत.

गेले अनेक दिवस विकी आणि सारा ‘जरा हटके जरा बचके’चं जोरदार प्रमोशन करताना दिसत होते. तर या चित्रपटाने चार दिवसांमध्येच २२ हून अधिक कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. यामुळेच विकी आणि साराने आज सिद्धिविनायकाचं दर्शन घेत देवाचे आभार मानले.

आणखी वाचा : आलिशान घर, गाड्या आणि…; चाळीत जन्मलेला विकी कौशल आज आहे कोट्यवधींचा मालक, संपत्तीचा आकडा वाचून व्हाल थक्क

विकीने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर दर्शन घेतानाचे काही फोटो पोस्ट केले. या फोटोमध्ये विकी आणि सारा सिद्धिविनायक समोर नतमस्तक होताना दिसत आहेत. हे फोटो पोस्ट करत विकीने लिहिलं, “मंगलमूर्ती मोरया. थँक यू बाप्पा!” परंतु गणपतीच्या दर्शनाला विकी साराबरोबर गेला. त्याची पत्नी कतरिना कुठेच दिसली नाही. त्यामुळे या पोस्टवर कमेंट्स करत नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा : “तुझा बॉयफ्रेंड कोण आहे?” अखेर सारा अली खानने दिलं उत्तर, म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका नेटकऱ्याने लिहिलं, “असे फोटो कतरिनाबरोबरही पोस्ट कर.” तर दुसरा म्हणाला, “कतरिनाची जागा हिला देऊ नकोस.” आणखी एकाने लिहिलं, “कतरिनाबरोबर लग्न करून सारा बरोबर फिरत आहेस. वाह भाई.” तर आणखी एक म्हणाला, “कतरिना वहिनीपेक्षा जास्त साराबरोबरचे फोटो आहेत आता तुझ्या प्रोफाईलवर.”