Kriti Kharbanda Pulkit Samrat Wedding : ‘शादी में जरूर आना’ फेम क्रिती खरबंदा व अभिनेता पुलकित सम्राट यांचा विवाहसोहळा १६ मार्चला थाटामाटात पार पडला. दोघांच्या शाही लग्नाचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पुलकित-क्रितीने मानेसरमध्ये लग्नगाठ बांधली. सध्या मनोरंजन विश्वातून या जोडप्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

लग्नसोहळा पार पडल्यावर क्रितीचा सासरी थाटामाटात गृहप्रवेश करण्यात आला. लग्नाच्या वरातीमध्ये या जोडप्याने जबरदस्त डान्स केल्याचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘विरल भय्यानी’ या पापाराझी इन्स्टाग्राम पेजवर पुलकित-क्रितीच्या गृहप्रवेशाची खास झलक शेअर करण्यात आली आहे. यामध्ये दोघेही डान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : अजित पवारांना भर कार्यक्रमात दाखवला सुप्रिया सुळेंचा ‘तो’ भावुक व्हिडीओ; उपमुख्यमंत्री म्हणाले, “आमच्या घरात…”

लग्नानंतर अभिनेत्री सुंदर अशी साडी नेसून भांगेत कुंकू भरून, हातात लाल रंगाचा चुडा अशा लूकमध्ये माध्यमांसमोर आली होती. नवऱ्यासह जबरदस्त डान्स केल्यावर या दोघांनी जोडीने गृहप्रवेश केला. सध्या हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे.

हेही वाचा : ‘झी मराठी चित्र गौरव’मध्ये ‘या’ चित्रपटाने मारली बाजी, तर सर्वोत्कृष्ट अभिनेता-अभिनेत्री ठरले…; पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून क्रिती-पुलकितच्या लग्नाची चर्चा चालू होती अखेर शनिवारी विवाहसोहळ्याचे फोटो शेअर करत अभिनेत्रीने सर्वांना ही आनंदाची बातमी दिली. लग्नात क्रितीने बेबी पिंक रंगाचा लेहेंगा, तर पुलकितने मिंट ग्रीन रंगाची शेरवानी परिधान केली होती.