बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन मागच्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. क्रिती सेनॉन सध्या प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता प्रभासला डेट करत असल्याच्या चर्चा होताना दिसत आहेत. एवढंच नाही तर लवकरच प्रभास आणि क्रिती साखरपुडा करणार असल्याचंही बोललं जात होतं. या सगळ्यावर क्रिती किंवा प्रभास यांपैकी कोणीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र आता क्रिती सेनॉनने या सर्व चर्चांवर मौन सोडलं आहे.

प्रभासला डेट करण्याच्या आणि साखपुड्याच्या चर्चांवर क्रिती सेनॉनने आता पूर्णविराम लावला आहे. अशाप्रकारच्या चर्चांवर नेहमीच कमीत कमी प्रतिक्रिया देत असल्याचं यावेळी क्रितीने स्पष्ट केलं. क्रिती म्हणाली, “जनता या गोष्टी दिर्घकाळ लक्षात ठेवत नाही. हे सगळं आता चर्चेत आहे पण कालांतराने या सगळ्या चर्चा संपून जातील.”

आणखी वाचा- “मूर्ती पूजा इस्लाममध्ये…”, महाशिवरात्रीला मंदिरातील फोटो शेअर केल्याने सारा अली खान ट्रोल

क्रिती सेनॉन म्हणाली, “अशाप्रकारच्या चर्चांवर प्रतिक्रिया देणं मी नेहमीच टाळते. कारण जेव्हा आपण यावर काही बोलतो तेव्हा अशा चर्चांना आणखी प्रोत्साहन मिळतं. पण जेव्हा मला वाटतं की या सगळ्याचा परिणाम माझ्या कुटुंबियांवर होत आहे किंवा एखादी गोष्ट आता मर्यादेपलिकडे जात आहे आणि माझ्या सन्मान, प्रतिमेला धक्का बसत आहे. तेव्हाच मी या सगळ्या गोष्टींवर प्रतिक्रिया देते. पण तेव्हाही कमीत कमी बोलण्याचा माझा कटाक्ष असतो.”

आणखी वाचा- “त्यांच्या प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह…”, राजामौलींना वादग्रस्त म्हणणाऱ्यांवर भडकली कंगना रणौत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान क्रिती सेनॉन सध्या कार्तिक आर्यनबरोबरच्या ‘शहजादा’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. पहिल्यांच दिवशी या चित्रपटाने ६ कोटींची कमाई केली होती. चित्रपटाला संमिश्र प्रतिक्रिया मिळताना दिसत आहेत. याआधी ती वरुण धवनच्या ‘भेडिया’मध्ये दिसली होती. तर आगामी काळात ती प्रभासबरोबर ‘आदिपुरुष’ चित्रपटात दिसणार आहे. ओम राऊतच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटात सैफ अली खान आणि सनी सिंह यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.