बॉलिवुड स्टार्स कधी मराठी बोलताना दिसले तर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसतो. आणि बॉलिवूड कलाकारांना चांगलं मराठी बोलता येतं.  श्रद्धा कपूर आपल्याला अनेकदा मराठीतून संवाद साधताना दिसते पण आता पहिल्यांदाच अभिनेत्री क्रिती सेनॉन मराठी बोलताना दिसली. इतकंच नाही तर तिने तिच्या भावाला मराठीचे धडे दिले.

क्रिती सेनॉन ही बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ती तिच्या उत्स्फूर्ततेने आणि तिच्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांची वाहवा मिळवत आली आहे. तर आता पहिल्यांदाच ती मराठी बोलताना दिसली. तिचा मराठी ऐकून सर्वच थक्क झाले आहेत.

आणखी वाचा : “पौराणिक व्यक्तिरेखांचा त्यांना…”; क्रिती सेनॉनचे ओम राऊतबद्दल मोठे वक्तव्य

क्रितीने नुकताच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये ती भावाबरोबर चालताना दिसत आहे. तर चालता चालता ती तिच्या भावाला मराठीचे धडे देत आहे. क्रिती म्हणते, “मी तुला काय शिकवलं?” त्यावर तिचा भाऊ म्हणतो, “झालं.” त्यावर क्रिती म्हणते, “आणि क्या हुआ? याला काय म्हणतात?” क्रितीचा हा प्रश्न ऐकल्यावर तिचा भाऊ विचार करू लागतो. तेव्हा क्रिती म्हणते, “काय झालं?” त्यावर तिचा भाऊही म्हणतो, “काय झालं.” भावाने दिलेला हे उत्तर आहे कोण क्रिती खूश होते आणि म्हणते, “छान.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा : क्रिती सेनॉन होणार प्रभासची बायको? त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करत म्हणाली…

क्रितीचा हा व्हिडीओ आता खूप चर्चेत आला आहे. त्यावर कमेंट करत आता तिथे चाहते तिचा हा मराठमोळा अंदाज आवडल्याचं सांगत आहेत.