सध्या सर्वत्र ‘आदिपुरुष’ चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटावर जोरदार टीका होताना दिसत आहे. या चित्रपटात दाखवली गेलेली दृश्य, कलाकारांचा अभिनय, चित्रपटाचे संवाद, या चित्रपटातील व्हीएफएक्स या सगळ्याबद्दल प्रेक्षक तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. अशातच अभिनेत्री क्रिती सेनॉनबद्दल एक मोठी माहिती सामोर आली आहे.

‘आदिपुरुष’ चित्रपटामध्ये प्रभास प्रभू श्रीरामांची भूमिका साकारली आहे, तर अभिनेत्री क्रिती सेनॉन सीतेच्या भूमिकेत दिसत आहे. नुकताच या चित्रपटाचा मुंबईत एक प्रीमियर शो झाला. या शोदरम्यान क्रितीने परिधान केलेल्या लूकने सर्वांचं लक्ष वेधलं. त्या दिवशी तिने परिधान केलेल्या शालीची किंमत आता समोर आली आहे.

आणखी वाचा : “पौराणिक व्यक्तिरेखांचा त्यांना…”; क्रिती सेनॉनचे ओम राऊतबद्दल मोठे वक्तव्य

मुंबईत संपन्न झालेल्या त्या प्रीमियर शोला क्रिती पारंपारिक वेशभूषेमध्ये दिसली. तिने ऑफ वाईट रंगाचा प्लेन लांब ड्रेस परिधान केला होता. तर त्यावर सुंदर नक्षीकाम केलेली एक पश्मीना शाल घेतली होती. ही शाल हाताने तयार करण्यात आली असून या पश्मीना शालीवर संपूर्ण रामायणाचं नक्षीकाम केलं होतं. क्रितीने ड्रेसवर घेतलेल्या या पश्मीना शालीची जी किंमत आहे त्यात एक आलिशान गाडी खरेदी करता येईल. मीडिया रिपोर्टनुसार, या शालीची किंमत थोडी थोडकी नसून तब्बल ११ लाख आहे आणि ही शाल तयार करण्यासाठी ६ हजार तास लागले आहेत.

हेही वाचा : ‘आदिपुरुष’साठी खर्च केलेल्या पैशांत तयार होतील अनेक बॉलीवूड चित्रपट; जाणून घ्या प्रभास-क्रितीच्या चित्रपटाचं बजेट

क्रितीने तिच्या या लूकमधील फोटोही तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले होते. या ड्रेसला साजेसं छोटंसं गळ्यातलं आणि कानातले तिने घातलं होतं. तिचा तो लूक सर्वांनाच आवडला होता. पण आता त्या शालीची किंमत कळल्यावर सर्वांचेच डोळे पांढरे झाले आहेत.