Kuch Kuch Hota Hai Completed 25 Years : करण जोहर दिग्दर्शित ‘कुछ कुछ होता है’ चित्रपट १६ ऑक्टोबर १९९८ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात शाहरुख खान, काजोल, राणी मुखर्जी, अनुपम खेर, रिमा लागू, फरिदा जलाल, अर्चना पुरण सिंग, जॉनी लिवर आणि पाहुणा कलाकार म्हणून सलमान खान अशा दिग्गज कलाकारांची फौज होती. आज या चित्रपटाला २५ वर्ष पूर्ण झाल्याने करण जोहरने एक भावुक पोस्ट शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

हेही वाचा : Video : १९७५ च्या सदाबहार मराठी गाण्यावर पूजा सावंत आणि वैभव तत्त्ववादीचा रोमँटिक डान्स, नेटकरी म्हणाले…

करण जोहर लिहितो, “२५ वर्षांपूर्वी या गोष्टीची सुरुवात झाली आणि आज ही केवळ एक गोष्ट नसून, हा चित्रपट माझ्यासाठी माझ्या भावना आहेत. तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रेमामुळे हे शक्य झालं. माझ्या कथेवर मनापासून प्रेम केल्याबद्दल सर्व प्रेक्षकांना मी धन्यवाद म्हणतो. या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्गजांबरोबर काम करण्याची मला संधी मिळाली होती. माझा चित्रपट पाहणाऱ्या सर्व लोकांचा मी सदैव ऋणी राहीन. हा चित्रपट माझ्या कायम जवळचा असेल.”

हेही वाचा : ठरलं तर मग : सायली-अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं भांडं फुटणार? जोगतीण सांगणार सत्य, पाहा नवा प्रोमो

‘कुछ कुछ होता है’ ला २५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रविवारी रात्री एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला राणी मुखर्जी, शाहरुख खान आणि करण जोहर उपस्थित होते. करणच्या या भावुक पोस्टवर मराठी अभिनेत्याने कमेंट करत लक्ष वेधून घेतलं आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणीही नसून ‘सुभेदार’ फेम चिन्मय मांडलेकर आहे.

हेही वाचा : ‘कुछ कुछ होता है’ झाला २५ वर्षांचा! वाचा माहित नसलेले ‘हे’ खास किस्से

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
karan johar
करण जोहर पोस्ट

मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या चिन्मय मांडलेकर करणच्या पोस्टवर कमेंट करत लिहितो, “या चित्रपटाला अनेकांनी नावं ठेवली पण, माझं या चित्रपटावर मनापासून प्रेम आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर साधारण एक दशकानंतर जन्मलेल्या माझ्या मुलीला सुद्धा ‘कुछ कुछ होता है’ तेवढाच आवडतो. करण जोहर सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. राहुल-अंजली नसते, तर आज रॉकी आणि रानीदेखील नसते.” दरम्यान, ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटाला २५ वर्ष पूर्ण झाल्याने आज संपूर्ण बॉलीवूडमधून करण जोहरवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.