‘लस्ट स्टोरीज २’ मध्ये अभिनेत्री काजोलबरोबर अभिनेता कुमुद मिश्रांचे बोल्ड सीन आहेत. चित्रपटातील आपल्या बोल्ड भूमिकेबद्दल आणि चित्रपटाच्या शूटिंगचा अनुभवाबद्दल कुमुद मिश्रांनी भाष्य केलं. काजोलबरोबर काम करणं खूप सोपं गेलं, असंही ते म्हणाले.

कुमुद मिश्रा म्हणाले, “लस्ट स्टोरीची स्क्रिप्ट आली तेव्हा मला ती वाचायला खूप मजेदार वाटली. साहजिकच मी अशा प्रकारचे काम आधी केले नव्हते, त्यामुळे काही गोष्टींबद्दल मला शंका होती. हे माझ्याबरोबर पहिल्यांदाच घडत असल्याने मला क्लॅरिटीशिवाय पुढे जायचं नव्हतं. मी दिग्दर्शकाला भेटलो, आमच्यात खूप चर्चा झाली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आम्ही त्या दृश्यांबद्दल बोलत नव्हतो जे मला अवघड वाटले होते. पण त्याच्याशी बोलताना मला त्याच्या हेतूची आणि सौंदर्य मूल्याची कल्पना आली. या चित्रपटासाठी आम्ही अनेक कार्यशाळा घेतल्या. माझ्या आणि लेखकांच्या टीममध्ये स्क्रिप्टवर चर्चा झाली, त्यावरून हे लोक सर्व गोष्टी गांभीर्याने घेत असल्याचं मला समजलं. जर तुम्ही हा चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला यात अनेक पैलू आहेत, हे दिसून येईल. तसेच सर्वांच्या भावना आणि नातेसंबंध अतिशय गुंतागुंतीच्या पद्धतीने दाखवले आहेत,” असंही ते म्हणाले.

पहिल्या डेटवर कधी सेक्स केला आहे का? तमन्ना भाटिया व विजय वर्मा म्हणाले…

बोल्ड सीनबद्दल बोलताना कुमुद मिश्रा म्हणाले, “असे सीन करताना संकोच असतोच. मी २१ वर्षांचा नाही, माझं वय झालंय, त्यामुळे असे सीन करताना मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. माझे सीन्स करताना मी पूर्णपणे कलाकार बनतो. संकोच फक्त बोल्ड सीन करतानाच असतो, असं नाही. अनेक वेळा तुम्ही सामान्य सीनमध्येही या परिस्थितीतून जात असता, सामान्य सीन करतानाही अडचणी येतात, कारण कुठेतरी दोन कलाकारांमध्ये एक भिंत असते, जी तोडणं गरजेचं असतं.”

Video: एकमेकांच्या जवळ गेले अन्…; ‘Bigg Boss OTT 2’मध्ये स्पर्धकांनी सर्वांसमोर एकमेकांना केलं लिपलॉक किस

पुढे ते म्हणाले, “इथे मला सुरुवातीला संकोच वाटला. माझी सहकलाकार काजोल होती. ती अगदी सहजपणे जबरदस्त काम करते. आम्हा कलाकारांना तो टप्पा गाठायला अनेक वर्षे लागतात. इतकी वर्षे काम केल्यानंतर सहकलाकारांशी कसं वागायचं, हे त्यांना माहीत असतं. या फिल्ममध्ये सर्वात मोठा प्लस पॉइंट काजोल होती. तिच्यामुळे गोष्टी सोप्या झाल्या. एकदा का तुम्ही सेटवर एकत्र काम करायला सुरुवात केली की हळूहळू तुम्ही कंफर्टेबल होता.”

आकांक्षा पुरीला सर्वांसमोर किस करणारा जैद हदीद आहे घटस्फोटित; कोण आहे त्याची पूर्वाश्रमीची पत्नी?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काजोलबरोबर पहिल्यांदा काम करण्याचा अनुभवही कुमुद मिश्रांनी सांगितला. “कलाकार म्हणून काम करत असताना तुम्हाला समोरच्या समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात जो विश्वास दिसतो तो पाहून आपण हळूहळू कंफर्टेबल होत जातो. काजोल एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे. तिने माझ्यासाठी काम सोपं केलं होतं. सेटवर जाताना तुम्ही जी पहिली भेट किंवा पहिली ओळ बोलता ती तुमच्या भविष्यातील कामाचा सूर ठरवते. जेव्हा मी काजोलला पहिल्यांदा भेटले तेव्हा ती खूप चांगल्या पद्धतीने भेटली. तिच्याशी झालेल्या पहिल्या भेटीतच काम करणं सोपं होईल, असं मला वाटलं होतं. ती एक अप्रतिम अभिनेत्री आहे, जी तिच्याबरोबरच्या कलाकारांना पूर्णपणे पाठिंबा देते,” असं कुमुद मिश्रा म्हणाले.