Kussh Sinha on Sonakshi Sinha Wedding : गेल्यावर्षी २३ जून रोजी बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने झहीर इक्बालबरोबर लग्नगाठ बांधली. या जोडप्याने नोंदणीकृत विवाह केला आणि एकमेकांबरोबर नवीन आयुष्य सुरू करण्याचा निर्णय घेतला. सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नानंतर काहींनी या विवाहाचे समर्थन केलं होतं, तर कोणी या लग्नाविरोधात बोललं. या चर्चांसह हे लग्न त्यांच्या काही कौटुंबिक मतभेदांमुळेही चर्चेत आले होते.

सोनाक्षीच्या लग्नात वडील शत्रुघ्न सिन्हा व आई पूनम सिन्हा यांनी हजेरी लावली होती. पण लव व कुश हे दोघे भाऊ बहिणीच्या लग्नात सहभागी झाले नाहीत अशा अनेक चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. लवने सोनाक्षीच्या लग्नातील अनुपस्थितीबद्दल प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर कुशनेही सांगितले होते की, तोदेखील बहीणीच्या लग्नाला उपस्थित होता. अशातच आता कुशने पुन्हा एकदा यावर उत्तर दिलं आहे.

न्यूज१८ ला दिलेल्या एका खास मुलाखतीत, कुशने सोनाक्षीच्या लग्नात गैरहजर असल्याचं वृत्त नाकारलं. याबद्दल कुश म्हणाला, “माझ्या बहिणीच्या लग्नाला मी उपस्थित न राहिल्याबद्दल खूप चर्चा झाली होती. पण याबद्दल सांगायचं झालं तर ती खोटी बातमी होती. मला माहित नाही की, या चर्चा कोणी केल्या होत्या. पण मी गेल्या वर्षीच याचं स्पष्टीकरण दिलं होतं की, मी लग्नात उपस्थित होतो.”

सोनाक्षी सिन्हा इन्स्टाग्राम पोस्ट

यापुढे कुश म्हणाला, “मी एवढेच सांगेन की, सोनाक्षी माझी बहीण आहे आणि मी तिचा आदर करतो. तिच्यावर माझं प्रेम आहे. मी तिच्या लग्नात का नसेन?” यापुढे त्याने सोशल मीडियावरील ट्रोलिंगबद्दलही मत व्यक्त केलं. याबद्दल कुश म्हणाला, “ट्रोलिंगचा मला काही त्रास होत नाही किंवा त्याचा माझ्यावर काहीच परिणाम होत नाही.”

यानंतर कुशने म्हटलं, “माझ्यावर टीका करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला उत्तर देण्याची मला गरज वाटत नाही. मी माझ्या मित्रांच्या आणि माझ्या जवळच्या लोकांच्या मतांनाच महत्त्व देतो. मी माझ्या वडिलांना खूप काही सहन करताना पाहिले आहे. त्यामुळे या सगळ्या नकारात्मक चर्चांना कसं उत्तर द्यायचं हे आम्ही त्यांच्याकडून शिकलो आहोत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल यांनी २३ जून २०२४ रोजी लग्न केलं. जवळपास ७ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. नोंदणी पद्धतीने लग्न झाल्यानंतर सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीमध्ये अनेक बॉलीवूड कलाकारांनी हजेरी लावली होती.