scorecardresearch

Premium

दिलीप कुमारांची बहीण रुग्णालयात दाखल; पत्नी सायरा बानो घेत आहेत काळजी

गेल्या ७ दिवसांपासून त्या रुग्णालयात उपचार घेत आहेत

deelip kumar
दिलीप कुमार

बॉलिवूडचे ट्रॅजेडी किंग अभिनेते दिलीप कुमार यांचे मागच्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोकाकुल झाली. दिलीप कुमार यांना आजही त्यांचे चाहते विसरले नाहीत. दिलीप कुमार यांच्या संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. दिलीप कुमार यांची बहीण फरीदा यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

माध्यमांच्या अहवालानुसार फरीदा गेल्या ७ दिवसांपासून कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात उपचार घेत आहेत. आता त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचे समोर आले आहे. सायरा बानोही त्यांची काळजी घेत असल्याचे वृत्त आहे. सायरा बानोची तब्येत ठीक नाही, तरीही त्या सतत फरिदाला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जात आहेत आणि डॉक्टरांकडून त्यांची चौकशी करत आहेत.

90 school kids paralyzed
बापरे! शाळेतील ९० मुलींना एकाच वेळी अर्धांगवायूचा झटका? VIDEO पाहून उडेल थरकाप…
In Surat, 13 year old girl dies of suspected heart attack in classroom
धक्कादायक! गुजरातमध्ये आठवीच्या विद्यार्थीनीचा शाळेतच हार्ट अटॅकने मृत्यू, घटनेचा VIDEO व्हायरल
Woman Biker Threatens, Abuses Cops On Bandra-Worli Sea Link When Stopped
VIDEO: ‘हात कापून टाकेन,’ वरळी सी-लिंकवर रोखल्याने महिलेची पोलिसांना धमकी, म्हणाली ‘जा त्या नरेंद्र मोदींना…’
bihar school student drumming and played on bench in classroom
शाळेत बाकांचा ढोल अन् कंपास पेटीचा ततड-ततड ताशा; विद्यार्थ्यांचा अफलातून VIDEO व्हायरल

मेहुण्यानंतर आता सलमानची भाची करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण; पुरस्कार विजेत्या दिग्दर्शकाबरोबर करणार काम

दिलीप कुमार आणि फरिदाचा पुतण्या साकिब जो मेहबूब खान (सईदाचा मुलगा) यांचा नातू आहे, हे देखील फरिदाची काळजी घेत आहेत. दिलीप कुमार यांच्या निधनानंतर सायरा बानो प्रत्येकाची काळजी घेत आहेत. दिलीप कुमार आणि सायरा बानू यांची प्रेमकहाणी सगळ्यांना ठाऊक आहे. शाहरुख खान या कुटुंबाच्या जवळ आहे. तोदेखील यांची चौकशी करत असतो.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Late bollywood actor dilip kumar sister farida hospitalized saira banu taking care spg

First published on: 23-11-2022 at 14:01 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×