‘लव्ह आज कल २’ फेम अभिनेत्री आरुषी शर्माने गुपचूप लग्न उरकलं आहे. तिच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अभिनेत्रीने बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टरशी लग्नगाठ बांधली आहे. तिने अद्याप लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले नाही, पण तिच्या लग्नात हजर असलेल्या मंडळींनी काही फोटो पोस्ट केले आहेत.

‘काला पानी’ या वेब सीरिजमध्ये शेवटची दिसलेली आरुषी शर्माने आयुष्यभरासाठी तिचा जोडीदार निवडला आहे. अभिनेत्रीने १८ एप्रिल रोजी हिमाचल प्रदेशमध्ये लग्नगाढ बांधली. तिने प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर वैभव विशांतशी गुपचूप लग्न केलं. आरुषी आणि वैभवने अत्यंत खासगी सोहळ्यात सात फेरे घेतले. या लग्नाला फक्त त्यांचे कुटुंबीय आणि काही जवळचे मित्र उपस्थित होते.

“हे खोटं आहे”, एकता कपूरने फेटाळला स्मृती इराणींचा ‘तो’ दावा; म्हणाली, “एका सेकंदात…”

आरुषी शर्माच्या लग्नाचे फोटो खूप व्हायरल होत आहेत. ती पेस्टल रंगाचा लेहेंग्यामध्ये खूप सुंदर दिसत आहे. वैभवनेही खूप सुंदर अशी नक्षीदार शेरवानी घातली आहे. दोघांचे फोटो समोर आल्यावर चाहते कमेंट्स करून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत.

“आराध्या १२ वर्षांची आहे, पण ती…”, नव्या नवेलीचं मामाच्या मुलीबद्दल विधान; म्हणाली, “तिला मी कोणताही…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वैभव विशांत कोण आहे?

आरुषीचा पती आणि कास्टिंग डायरेक्टर वैभव विशांतबद्दल बोलायचं झाल्यास तो बॉलीवूडमधील प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर आहे. आत्तापर्यंत त्याने ‘बडे मियाँ छोटे मियाँ’, ‘पीके’, ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ आणि ‘बदलापूर’ सारख्या जवळपास ५० चित्रपटांसाठी कास्टिंगचं काम केलं आहे. विशेष म्हणजे वैभवने ‘काला पानी’ या वेब सीरिजसाठी कास्टिंग डायरेक्टर म्हणूनही काम पाहिलं होतं, यात आरुषीनेही काम केलं होतं. आरुषी आणि वैभवची केमिस्ट्री इथूनच सुरू झाली आणि आता ते लग्नबंधनात अडकले, असं म्हटलं जातंय.