Madhuri Dixit And Salman Khan AI Video: एआयमुळे कल्पनाशक्तीमधील गोष्टी प्रत्यक्षात पाहता येतात. सध्या एआयमुळे अनेक गोष्टी सोप्या होताना दिसत आहेत. माहिती मिळवण्यापासून काही क्रिएटिव्ह गोष्टी तयार करण्यासाठी एआयचा वापर केला जात आहे. आता सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ हॉलीवूडच्या ‘टायटॅनिक’ चित्रपटातील सीन आहे. आता या सीनची इतकी चर्चा होण्याचे कारण म्हणजे चित्रपटातील मूळ कलाकार नाही तर बॉलीवूडचे दोन लोकप्रिय चेहरे या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. हे दोन लोकप्रिय कलाकार म्हणजे माधुरी दीक्षित आणि सलमान खान हे आहेत.

‘टायटॅनिक’ हा जगभर गाजलेला चित्रपट आहे. या चित्रपटातील काही सीन मोठे लोकप्रिय ठरले होते. यामध्ये लिओनार्डो डिकॅप्रियो आणि केट विन्सलेट यांनी प्रमुख भूमिकेत काम केले होते. मात्र, एआयद्वारे तयार केलेल्या या व्हिडीओमध्ये या कलाकारांऐवजी सलमान खान व माधुरी दीक्षित दिसत आहे.

माधुरी दीक्षित व सलमान खानचा व्हिडीओ पाहिलात का?

माधुरी रोझ या भूमिकेत तर सलमान जॅक या भूमिकेत दिसत आहे. रोझ व जॅक यांच्यातील रोमँटिक, भावनिक सीन या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर हा व्हिडीओ धुमाकूळ घालताना दिसत आहे. चाहते या व्हिडीओला भरभरून प्रतिसाद देताना दिसत आहेत. माधुरी व सलमान यांच्याबरोबरच सिमी गरेवाल, आमिर खान, अनुपम खेर, नसरुद्दीन शाह, असे अनेक कलाकारदेखील दिसत आहेत.

हा व्हिडीओ अनधिकृत आणि एआयने तयार केलेला असला तरी तो उत्तमरित्या तयार केल्याचे चाहते कमेंट करत म्हणत आहेत.

सलमान खान व माधुरी दीक्षित ही जोडी ‘साजन’, ‘दिल तेरा आशिक’ या चित्रपटांत एकत्र दिसली होती. सलमान खानच्या कामाविषयी बोलायचे तर अभिनेता सिंकदर या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मात्र, या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसले. आता अभिनेता कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

तर माधुरी दीक्षित भुल भुलैय्या ३ या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसली होती. या चित्रपटात विद्या बालन व कार्तिक आर्यनदेखील प्रमुख भूमिकेत दिसले होते. या चित्रपटातील माधुरीच्या भूमिकेचे प्रेक्षकांकडून कौतुक झाल्याचे पाहायला मिळाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अभिनेत्री सोशल मीडियावरदेखील सक्रिय असल्याचे दिसते.