अनिल कपूर, अक्षय कुमार, शाहरुख खान ते सलमानपर्यंत अगदी सगळ्या बॉलीवूड कलाकारांबरोबर माधुरी दीक्षितने काम केलेलं आहे. ९० च्या दशकांत तिने अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. परंतु, या सगळ्यात असा एक बॉलीवूड अभिनेता आहे ज्याच्याबरोबर माधुरीने आजवर एकदाही एकत्र काम केलेलं नाही. अभिनेत्री सध्या ‘डान्स दिवाने’ या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका निभावत आहे. यादरम्यान माधुरीने वैयक्तिक तसेच व्यावसायिक आयुष्यातील अनेक गोष्टींबाबत खुलासा केला आहे.

माधुरी दीक्षित आणि बॉलीवूडचा ‘अन्ना’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुनील शेट्टीने आजवर एकाही चित्रपटात एकत्र काम केलेलं नाही. “मी आणि सुनील पहिल्यांदाच या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आलो. पण, याआधी आम्ही एकत्र चित्रपट का नाही केला याबाबत मला काहीच कल्पना नाही. त्यामुळे चित्रपटात जरी एकत्र काम केलेलं नसलं, तरीही आता या शोच्या निमित्ताने आम्ही नक्की चांगलं काम करू.” असं माधुरीने काही दिवसांआधी डान्स दिवानेच्या रंगमंचावर सांगितलं होतं.

हेही वाचा : Video : हिंदी प्रेक्षकांना पडली ‘जीव माझा गुंतला’ फेम योगिता-सौरभची भुरळ, व्हिडीओवर कमेंट्स करत म्हणाले…

माधुरी अन् सुनील शेट्टीने चित्रपटात जरी एकत्र काम नसलं तरीही ‘डान्स दिवाने’च्या रंगमंचावर नुकताच त्यांनी एका लोकप्रिय बॉलीवूड गाण्यावर एकत्र डान्स केला आहे. अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

हेही वाचा : अमिताभ बच्चन यांना नेमकं काय झालंय? आता प्रकृती कशी आहे? माहिती आली समोर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२७ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘दिल तो पागल है’ चित्रपटातील “डोलाना…” गाण्यावर माधुरी दीक्षित आणि सुनील शेट्टी एकत्र थिरकले आहेत. नेटकऱ्यांनी त्यांच्या या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा भरभरून वर्षाव केला आहे. दरम्यान, ‘दिल तो पागल हैं’ या १९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटात शाहरुख खान, माधुरी दीक्षित आणि करिश्मा कपूर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. यामध्ये शाहरुख व माधुरीवर “डोलना…” हे गाणं चित्रित करण्यात आलं होतं.