Madhuri Dixit & Karan Johar Dance Together : माधुरी दीक्षित उत्तम अभिनेत्री आहेच मात्र, तिला बॉलीवूडची ‘डान्सिंग डिवा’ म्हणून देखील ओळखलं जातं. ‘धकधक गर्ल’ने आजवर तिच्या दमदार नृत्यशैलीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ‘दिल तो पागल हैं’, ‘देवदास’, ‘अंजाम’ या चित्रपटांमध्ये माधुरीने केलेल्या दमदार डान्सचं आजही सर्वत्र कौतुक केलं जातं. नुकतीच प्रेक्षकांना पुन्हा एकदा बॉलीवूडच्या ‘धकधक गर्ल’च्या डान्स शैलीची झलक पाहायला मिळाली आहे, तिच्या डान्सचे व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहेत. माधुरी नेमकी कोणत्या पार्टीला गेली होती जाणून घेऊयात…

ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त १८ सप्टेंबरला बॉलीवूड स्टार्ससाठी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीत माधुरी… तिचे पती डॉ. श्रीराम नेने यांच्यासह सहभागी झाली होती. यावेळी माधुरीने लाल रंगाचा कॉर्डसेट घातला होता. यामध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत होती. या पार्टीमध्ये माधुरीने अनेक जुन्या गाण्यांवर जबरदस्त डान्स केल्याचं पाहायला मिळालं. माधुरी दीक्षित अन् रेखा या दोघी ‘कैसे पहेली जिंदगानी’ या गाण्यावर थिरकल्या. तर, माधुरीसह उर्मिला मांतोडकरने ‘रंगीला’मधील गाण्यावर ठेका धरला होता.

आता या पार्टीमधील आणखी एक व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. यामध्ये माधुरी बॉलीवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक व निर्माता करण जोहरसह डान्स करताना दिसत आहे. माधुरी आणि करणने १९७९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘डफलीवाले डफली बजा’ या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे.

‘डफलीवाले डफली बजा’ या गाण्याला आता ४६ वर्षे झाली असली तरीही या बॉलीवूड गाण्याची लोकप्रिय आजही सर्वत्र कायम आहे. माधुरी-करणने ‘डफलीवाले डफली बजा’ गाण्यावर भन्नाट एनर्जीसह डान्स केला. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

माधुरी आणि करण एकत्र डान्स करत असताना त्यांना या पार्टीत सहभागी झालेल्या अन्य पाहुण्यांनी प्रोत्साहन दिल्याचं यावेळी पाहायला मिळालं. तर, या पार्टीच्या होस्ट शबाना आझमी आणि त्यांचे पती जावेद अख्तर या दोघांनी ‘प्रिटी लिटल बेबी’ या इंग्रजी गाण्यावर डान्स करत या पार्टीत ठेका धरला होता.