९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून माधुरी दीक्षितला ओळखलं जातं. ‘तेजाब’, ‘खलनायक’, ‘राम लखन’, ‘दिल तो पागल हैं’, ‘हम आपके हैं कौन’ अशा असंख्य गाजलेल्या चित्रपटांमध्ये अभिनेत्रीने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. संपूर्ण इंडस्ट्रीत माधुरीला धकधक गर्ल म्हणून ओळखलं जातं. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. माधुरीचे अनेक चित्रपट रुपेरी पडद्यावर सुपरहिट ठरले आहेत. याशिवाय या सगळ्या चित्रपटांतील सदाबहार गाणी प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहेत.

माधुरी दीक्षितच्या वाट्याला आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक लोकप्रिय आणि गाजलेली गाणी आली. ती दमदार अभिनेत्री आहेच याशिवाय माधुरी उत्तम नृत्यांगना सुद्दा आहे. त्यामुळे अभिनेत्रीची अनेक गाणी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतात. २२ एप्रिल १९९४ मध्ये म्हणजेच बरोबर ३० वर्षांपूर्वी ‘अंजाम’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यामध्ये माधुरीबरोबर बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खानने प्रमुख भूमिका साकारली होती. या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. पण, या चित्रपटातलं “चने के खेत में…” हे गाणं सर्वत्र विशेष लोकप्रिय झालं.

हेही वाचा : ठरलं तर मग : अखेर प्रियाच्या हाती लागली कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाइल, सायली-अर्जुनसमोर मोठं संकट, पाहा प्रोमो

माधुरी दीक्षित नुकत्याच एका नामांकित ब्रँडच्या कार्यक्रमाला गेली होती. या कार्यक्रमात अभिनेत्रीच्या जुन्या चित्रपटातील “चने के खेत में…” हे सहाबहार गाणं वाजवण्यात आलं. हे गाणं ऐकल्यावर माधुरी स्वत:ला डान्स करण्यापासून रोखू शकली नाही. तिने “चने के खेत में…” गाण्याची हूकस्टेप करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तिचा डान्स आणि चेहऱ्यावरचे सुंदर हावभाव पाहून उपस्थितांनी एकच जल्लोष केला. माधुरीने अवघ्या काही मिनिटांचा डान्स करून सर्वांची मनं जिंकून घेतली. सध्या अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

माधुरीचा हा व्हिडीओ ‘विरल भय्यानी’ या पापाराझी इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. यावेळी माधुरीने लाल रंगाची आणि त्याला सोनेरी रंगाचा डिझायनर काठ असलेली सुंदर अशी साडी नेसल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : ७ वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीसह थाटला संसार, सहा वर्षांनी बाबा होणार प्रिन्स नरुला; पोस्ट करत दिली आनंदाची बातमी

नेटकऱ्यांनी माधुरीच्या या दिलखचक अदा पाहून अभिनेत्रीच्या या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. वयाच्या ५७ व्या वर्षी अभिनेत्रीने केलेला हा सुंदर डान्स पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. “सुंदर साडी आहे”, “तुमचं वय वाढतं की नाही”, “माधुरी आताच १८ वर्षांची वाटतेय” अशा प्रतिक्रिया धकधक गर्लच्या चाहत्यांनी या व्हायरल व्हिडीओवर दिल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, माधुरी दीक्षितच्या ‘डान्स दीवाने’ या कार्यक्रमाने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या कार्यक्रमात तिच्यासह अभिनेता सुनील शेट्टी परीक्षकाच्या भूमिकेत होता. आता लवकरच माधुरी ‘भुल भुलैय्या ३’ मध्ये झळकणार असल्याचं बोललं जात आहे.