गेल्या काही वर्षांपासून बॉलीवूडमध्ये अनेक सुपरहिट गाण्यांचे रिमेक होत आहेत. करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटांमध्ये ‘झुमका गिरा रे’ या गाण्याचं नवीन व्हर्जन ऐकायला मिळालं. तर आता आणखी एका सुपरहिट गाण्याचं रिमेक व्हर्जन प्रेक्षकांसमोर येणार आहे.

१९९५ साली ‘याराना’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला. याबरोबरच या चित्रपटातील गाणीही खूप गाजली. त्यापैकी एक गाणं म्हणजे ‘मेरा पिया घर आया.’ हे गाणं माधुरी दीक्षितवर चित्रित झालं होतं. तर आता याच गाण्याचं नवीन व्हर्जन येणार आहे. त्यावर माधुरीने प्रतिक्रिया दिली आहे.

आणखी वाचा : माधुरी दीक्षितच्या धाकट्या लेकाची उत्कृष्ट कामगिरी, अभिमान व्यक्त करत अभिनेत्री म्हणाली…

‘मेरा पिया घर आया 2.0’ असं या नवीन गाण्याचं नाव आहे. तर या गाण्यात सनी लिओनी झळकणार आहे. या गाण्याचा एक टीझर नुकताच प्रदर्शित झाला. हा टीझर शेअर करत माधुरी दीक्षितने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हा टीझर शेअर करत लिहिलं, “या गाण्याचं नवीन व्हर्जन पाहण्याची मी वाट बघत आहे. तुम्हाला माझ्याकडून खूप शुभेच्छा.”

हेही वाचा : Video: माधुरी दीक्षितने दिले मिसळ बनवण्याचे धडे, खास टिप्स शेअर करत म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या गाण्यात सनी लिओनीचा बोल्ड अंदाज पाहायला मिळेल. या गाण्याच्या टीझरला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. हे नवीन गाणं उद्या प्रदर्शित केलं जाईल.