बॉलिवूडची ‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षित ९० च्या दशकात सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री ठरली होती. आपल्या हास्याने माधुरीने सर्वांवर जादू केली होती. त्या काळी माधुरी दीक्षित आणि संजय दत्त यांच्या अफेअरची बरीच चर्चाही झाली. एवढंच नाही तर माधुरीने अनेक मुलाखतींमध्ये बिनधास्तपणे संजयचं नावही घेतलं होतं. पण नंतर या दोघांमध्ये दुरावा आला आणि तिने डॉक्टर श्रीराम नेने यांच्याशी लग्न केलं. माधुरी दीक्षित आणि डॉक्टर नेने यांची पहिली भेट खूपच खास होती. ज्याची आठवण काढल्यावर आजही माधुरीला भीती वाटते.

माधुरी दीक्षितने चित्रपट सृष्टीत स्वतःची वेगळी जागा तयार केली आहे. आजही ती बॉलिवूड आणि टीव्ही जगतात सक्रिय आहे. करिअरच्या सुरुवातीच्या काळात माधुरी दीक्षित अभिनेता संजय दत्तच्या प्रेमात पडली होती. त्यावेळी संजय विवाहित होता आणि त्याची पत्नी रिचा त्यावेळी रुग्णालयात मरणाशी झुंज देत होती. पुढे काही कारणाने माधुरी- संजय यांच्यात दुरावा आला आणि माधुरीने कार्डिक सर्जन श्रीराम नेने यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. १९९९ मध्ये या दोघांनी कॅलिफोर्नियामध्ये लग्न केलं. त्यांना आज दोन मुलं आहेत.

आणखी वाचा- माधुरी दीक्षितला डावलून ‘परदेस’ चित्रपटासाठी सुभाष घईंनी केली होती महिमा चौधरीची निवड, कारण…

माधुरी आणि श्रीराम नेने यांची पहिली डेट म्हणजे एक एडव्हेंचर होतं. एका मुलाखतीत माधुरीने तिच्या पहिल्या डेटची आठवण सांगितली होती. माधुरी म्हणाली, “जेव्हा आमची पहिली डेट होती तेव्हा नेने मला म्हणाले की चल बाइकने डोंगरावर जाऊ. त्यावेळी माझी अवस्था अशी होती की मागच्या बऱ्याच वर्षांत मी सायकलवरही बसले नव्हते. पण मी विचार केला की चला जाऊयात. त्यावेळी माझ्या आईने मला विचारलं तुला माहीत आहे ना तू काय करत आहेस? तुला माहीत आहे ना बाइकने डोंगरांवर जाणं काय असतं? त्यावर मी तिला म्हणाले, हो मला माहीत आहे बाइकवर मागे बसायचं आहे आणि जायचं आहे. पण जेव्हा मी बाइकवरून गेले तेव्हा मला कळलं की माउंटन बाइकिंग काय असते.”

आणखी वाचा- सलमानबरोबर करायचा होता ‘तो’ सीन, माधुरी दीक्षितने चक्क चित्रपटच नाकारला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माधुरी पुढे म्हणाली, “जेव्हा मी त्या डोंगरावरून जात होते तेव्हा खूप घाबरले होते. डोंगरांवरून खाली पाहिल्यानंतर मला खूप भीती वाटली होती. थोड्या वेळाने मी नेनेंना सांगितलं की हे सगळं मी अगोदर कधीच केलेलं नाही. तेव्हा ते चकित झाले. ते मला म्हणाले तुझ्यात खूप हिंमत आहे.” दरम्यान माधुरीला आयुष्यभराचा साथी म्हणून जी व्यक्ती अपेक्षित होती ते डॉक्टर नेने होते त्यामुळे तिने त्यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.