Rekha & Madhuri Dixit Dance Together : ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त सगळ्या बॉलीवूड सेलिब्रिटींसाठी एका खास पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीला रेखा, सोनू निगम, फराह खान, माधुरी दीक्षित व तिचे पती, उर्मिला मातोंडकर, संजय कपूर असे सगळे स्टार्स उपस्थित होते. सध्या या पार्टीमधील Inside व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

लोकप्रिय अभिनेता संजय कपूरने शबाना आझमी यांना ७५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये सगळ्या अभिनेत्री एकत्र येऊन डान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

माधुरी दीक्षित आणि रेखा यांनी एकत्र सुनिधी चौहानने गायलेल्या ‘परिणीता’ सिनेमातील ‘कैसी पहेली जिंदगानी’ गाण्यावर सुंदर डान्स करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. विशेष म्हणजे या दोघी बॉलीवूडच्या एक्स्प्रेशन्स क्वीन्स म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळे ‘कैसी पहेली जिंदगानी’ या गाण्यावर डान्स करताना सुद्धा या दोघींची एनर्जी, त्यांचे एक्स्प्रेशन्स लक्षवेधी ठरले.

अभिनेता संजय कपूरने ‘The OG Queens of Bollywood’ असं कॅप्शन देत हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये माधुरी अन् रेखाला विद्या बालन, उर्मिला मातोंडकर आणि स्वत: बर्थडे गर्ल शबाना आझमी या तिघींनी साथ दिल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हिडीओच्या शेवटी माधुरी आणि शबाना आझमी एकत्र डान्स करत असल्याचं देखील पाहायला मिळतंय.

या सगळ्याच अभिनेत्रींनी बॉलीवूडमध्ये ९० दशक गाजवलं होतं. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “रेखाजी किती सुंदर अदा”, “माधुरी आणि रेखा…या दोघी जशा आधी दिसायच्या तशाच आजही दिसतात”, “वॉव किती सुंदर व्हिडीओ आहे… सगळ्या आघाडीच्या अभिनेत्री एकत्र आणि त्यांच्यात तेवढंच प्रेम”, “ओल्ड इज रिअली गोल्ड किती छान व्हिडीओ”, “उर्मिला मातोंडकर अजूनही रंगीला Vibes देतेय” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.