संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘देवदास’ चित्रपटाचे आजही लाखो चाहते आहेत. २००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एक वेगळीच जादू निर्माण केली होती. शाहरुख खानने साकारलेला ‘देवदास’, ऐश्वर्याने साकारलेली ‘पारो’ असो किंवा माधुरीने साकारलेली ‘चंद्रमुखी’ या चित्रपटातील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून गेलं आहे.

‘देवदास’ चित्रपटातील प्रत्येक गाणं आजही लोकप्रिय आहे. सध्या इन्स्टाग्राम रील्सवर ऐश्वर्या राय आणि शाहरुख खान यांच्यावर चित्रित झालेल्या “बैरी पिया…” या गाण्याची तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ निर्माण झाली आहे. सामान्य लोकांपासून ते मोठमोठ्या सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकजण या गाण्यावर व्हिडीओ बनवत असल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : Video : शाहरुखचे ‘जबरा फॅन्स’! मन्नतबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी, किंग खानने लेक अबरामसह दिल्या ईदच्या शुभेच्छा

प्रेक्षकांच्या लाडक्या धकधक गर्लला सुद्धा या गाण्यावर व्हिडीओ बनवण्याचा मोह आवरला नाहीये. सुंदर असा पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान करून माधुरीने “बैरी पिया…” या गाण्यावर रील व्हिडीओ शेअर केला आहे. श्रेया घोषाल आणि उदित नारायण या दिग्गज गायकांच्या आवाजात हे गाणं संगीतबद्ध करण्यात आलं आहे. माधुरीने या गाण्यावर व्हिडीओ शेअर करत पुन्हा एकदा ‘देवदास’ चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

हेही वाचा : मुग्धा वैशंपायन सासूबाईंना ‘या’ नावाने मारते हाक, वाढदिवशी शेअर केलेली पोस्ट चर्चेत

View this post on Instagram

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माधुरीचे कमालीचे हावभाव पाहून नेटकरी सुद्धा भारावून गेले आहे. धकधक गर्लच्या व्हिडीओवर एका दिवसाच्या आत २० लाखांहून अधिक व्ह्यूज आणि एक हजारांहून जास्त कमेंट्स आल्या आहेत. यावरून माधुरी आणि ‘देवदास’ चित्रपटाची आजही किती क्रेझ आहे याची प्रचिती मिळते. “क्वीन…”, “तुम्ही खूप सुंदर आहात”, “सुंदर हावभाव” अशा कमेंट्स करत नेटकऱ्यांनी माधुरीचं कौतुक केलं आहे.