कामाबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमी चर्चेत असणाऱ्या कलाकारांपैकी एक अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित. तिच्या कामाबरोबरच वैयक्तिक आयुष्यात तिचं काय सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. माधुरी देखील सोशल मीडियावरून त्याबद्दलचे अपडेट्स चाहत्यांना देत असते. पण आता तिने तिच्या दोन्ही मुलांबद्दल केलेली एक पोस्ट खूप चर्चेत आली आहे.

माधुरी सोशल मीडियावर सक्रिय राहून नेहमी तिच्या कुटुंबाबद्दलच्या गोष्टी शेअर करत असते. ती अनुभवणारे सगळे सुख-दुःखाचे क्षण तिच्या चाहत्यांना सांगत असते. तिच्या मुलांचं देखील सोशल मीडियावरून ती अनेकदा कौतुक करत असते. तिची दोन्ही मुलं आता कॉलेजला आहेत. ती परदेशात शिक्षण घेतात. सुट्टी संपून आता ती पुन्हा एकदा परदेशात गेल्याने माधुरी भावूक झाली आहे.

आणखी वाचा : माधुरी दीक्षितच्या धाकट्या लेकाची उत्कृष्ट कामगिरी, अभिमान व्यक्त करत अभिनेत्री म्हणाली…

तिने तिच्या दोन्ही मुलांबरोबरचे फोटो शेअर करत लिहिलं, “माय बॉईज… तुम्ही दोघेही आता कॉलेजमध्ये आहात. वेळ कसा निघून गेला कळलच नाही. पण तरीही तुमचा प्रवास पाहण्यासाठी उत्तम माणूस घडताना तुम्हाला पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि प्रत्येक वेळी मी तुम्हाला खूप मिस करेन. तुमच्या दोघांशिवाय हे घर अपूर्ण असेल.”

हेही वाचा : माधुरी दीक्षितने परिधान केलेल्या चिकनकारी कुर्तीची किंमत फक्त…; अभिनेत्रीच्या साधेपणाचं होतंय कौतुक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता माधुरीची ही पोस्ट खूप चर्चेत आली असून त्यावर तिच्या चाहत्यांनी आणि मनोरंजन सृष्टीतील तिच्या काही मित्रमंडळींनी कमेंट करत विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.