बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. मागच्या काही वर्षांपासून दोघं एकमेकांना डेट करत आहेत. दरम्यानच्या काळात त्यांच्या लग्नाबाबत वेगवेगळ्या अफवाही उठल्या होत्या. पण नंतर या दोघांनी अद्याप लग्नाचा विचार नसल्याचं स्पष्ट केलं. पण आता एका ट्वीटमुळे पुन्हा एकदा या दोघांचा साखरपुडा आणि लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे.

मलायका अरोराने २०१७ मध्ये पती अरबाज खानपासून घटस्फोट घेतला. त्यानंतर २०१९मध्ये तिने अर्जुन कपूरला डेट करत असल्याची कबुली दिली होती. मागच्या काही वर्षांपासून हे दोघंही रिलेशनशिपमध्ये आहेत आणि आता ते लवकरच लग्न करू शकतात असं बोललं जात आहे. चाहत्यांमध्येही या दोघांच्या लग्नाबाबत उत्सुकता असून एका ट्रेड एक्सपर्टच्या ट्वीटनंतर लवकरच हे दोघं साखरपुडा करणार असल्याचं बोललं जात आहे.

आणखी वाचा- “या सगळ्या गोष्टींवर…”, सिद्धार्थच्या निधनानंतर लग्नाबद्दल पहिल्यांदाच बोलली शहनाझ गिल

ट्रेड एक्सपर्ट उमर संधूने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून एक ट्वीट केलं आहे. ज्यामुळे मलायका आणि अर्जुन कपूर यांच्या लग्नाच्या चर्चांना पुन्हा सुरुवात झाली आहे. मलायका आणि अर्जुनचा एक फोटो शेअर करत उमरने त्याच्या ट्वीटमध्ये लिहिलं, “ब्रेकिंग न्यूज, मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर पुढच्या आठवड्यात पॅरिसमध्ये साखरपुडा करणार आहेत.” उमरच्या या ट्वीटनंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. दोघांच्याही कुटुंबियांच्या उपस्थितीत साखरपुडा होणार असल्याचंही बोललं जात आहे. तसेच मार्चमध्ये हे दोघं लग्नाची प्लानिंग करत असल्याचीही चर्चा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच असंही म्हटलं होतं की मलायका आणि अरबाज खान यांचा मुलगा अरहानचं अर्जुन कपूरशी चांगलं बॉन्डिंग नाही त्यामुळे तो आता वडील अरबाज खानबरोबर राहत आहे. मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचं १९९८ मध्ये लग्न झालं होतं आणि २०१७ मध्ये दोघांनीही परस्पर संमतीने घटस्फोट घेतला होता. या दोघांच्या घटस्फोटानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.