Malaika Arora Dance With Rajkummar Rao Watch Video : बॉलीवूडची प्रसिद्ध नृत्यांगना व अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच तिच्या हटके डान्सने सर्वांचं लक्ष वेधून घेते. “छैया छैया…” ते “मुन्नी बदनाम हुई…” अशा बॉलीवूडच्या बऱ्याच गाजलेल्या गाण्यांवर मलायका थिरकली आहे. अभिनेत्री आता ५१ वर्षांची आहे मात्र, या वयातही तिने आपला फिटनेस जपला आहे. त्यामुळे तिचं सोशल मीडियावर विशेष कौतुक केलं जातं. मात्र, मलायकाला अनेकदा तिच्या ड्रेसिंग सेन्सवरून ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.
मलायका सध्या ‘हिप हॉप इंडिया सीझन २’ या शोमध्ये परीक्षकाची जबाबदारी सांभाळत आहे. अलीकडच्या काळात सगळ्याच रिअॅलिटी शोमध्ये नवनवीन चित्रपटांचं प्रमोशन करण्यासाठी कलाकार उपस्थित राहतात. राजकुमार राव आणि वामिका गब्बी त्यांचा आगामी सिनेमा ‘भूल चूक माफ’च्या प्रमोशनसाठी ‘हिप हॉप इंडिया सीझन २’च्या सेटवर गेले होते. यावेळी मलायकाने या सिनेमाच्या ‘चोर बाजारी’ या टायटल ट्रॅकवर जबरदस्त डान्स केला.
‘भूल चूक माफ’ या सिनेमात ‘चोर बाजारी’ हे २००९ मधलं मूळ गाणं रिक्रिएट करण्यात आलं आहे. याच गाण्यावर मलायकाने जबरदस्त डान्स करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ५१ वर्षीय मलायका तिच्यापेक्षा अकरा वर्षांनी लहान असलेल्या अभिनेता राजकुमार रावबरोबर भन्नाट डान्स करताना दिसली.
मात्र, मलायका कितीही चांगली नाचली तरीही यादरम्यान तिने घातलेला शॉर्ट ड्रेस सर्वांनाच खटकला आहे. तशा कमेंट्स मलायकाच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत. “मलायकाचा ड्रेसिंग सेन्स कधीच सुधारणार नाही”, “तिने आता स्वत:चं वय पाहून ड्रेस घालावेत”, “डान्स खरंच चांगला केलाय पण, मलायकाचा ड्रेस डिझायनर कोण आहे?”, “एक्स्प्रेशन अत्यंत वाईट आहेत…ती नेहमी असं काहीतरी करते जे अत्यंत वाईट दिसतंय”, “वाईट एक्स्प्रेशन्स देतेय…” अशा संतप्त कमेंट्स या व्हिडीओवर युजर्सनी केल्या आहेत. अनेकांनी लहान मुलं देखील हा शो पाहतात, याचं भान ठेव असंही कमेंट्समध्ये मलायकाला म्हटलं आहे.

दरम्यान, ‘भूल चूक माफ’ या सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, येत्या ९ मे रोजी हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होत आहे. यामध्ये प्रेक्षकांना राजकुमार राव आणि वामिका गब्बी यांची फ्रेश जोडी पाहायला मिळणार आहे.