मलायका अरोरा ही सध्या चित्रपटांपासून दूर असली तरी तिची सोशल मीडियावर तुफान क्रेझ आहे. मलायकाच्या फॅशनची कायमच चर्चा होत असते. अनेकदा मलायकाचे जिम लुक सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात तिच्या मुद्दाम वाकडे चालण्यावरून ती खूपदा ट्रोल झाली आहे. आपल्या आयुष्याबद्दलदेखील ती मोकळपणाने बोलत असते. सलमान खानचा भाऊ अरबाज खानबरोबर घटस्फोट घेतल्यावर मलायका आता अर्जुन कपूरला डेट करत आहे. नुकतेच तिने लग्नाबद्दल आपले मत सांगितले आहे.

अर्जुन कपूर मलायका एकमेकांना डेट करायला लागल्यापासून हे दोघे लग्न कधी करणार यावरून त्यांचा चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. याबाबत तिने एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की ‘मला वाटत लग्न ही एक सुंदर घटना आहे. त्याचवेळी मला वाटत की लग्नासाठी तुम्ही घाई करता कामा नये. केवळ सामाजिक आवश्यकता किंवा दबावाखाली येऊन लग्न करू नये, काही वेळा पालक तुमच्यावर जबरदस्ती करतात. जर तुम्ही योग्य व्यक्तीसोबत असाल तर ही एक सुंदर भावना आहे. पण जेव्हा माझ्या लग्नाचा प्रश्न येतो तेव्हा मला वाटते की मी या प्रश्नाचे उत्तर आता मी नाही देऊ शकत’.

अभिनेता संजय दत्तने गांधी जयंतीच्या निमित्ताने मुन्नाभाई चित्रपटातील ‘तो’ सीन केला शेअर

मलायका पुढे अर्जुनबद्दलदेखील भरभरून बोलली आहे ती असं म्हणाली की ‘अर्जुन बरोबर केवळ माझा केवळ बॉण्डच नव्हे तर तो माझा खास मित्र आहे. आपल्या मित्रावर प्रेम करणं आणि त्याला प्रेमात पाडणं हे गरजेचे आहे. अर्जुन मला समजून घेतो, मी अर्जुनबरोबर कोणतीही गोष्ट शेअर करू शकते. रिलेशनशिपमध्ये राहण्याची सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत जसे आहात तसे राहू शकता आणि मी जशी आहे तशी अर्जुनबरोबर जगू शकते’.

View this post on Instagram

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अर्जुन मलयकाचे नाते जगजाहीर झाले आहे. दोघे एकत्र वेळ घालवतात. एकत्र सुट्टीवर जातात. दोघे सोशल मीडियावरदेखील सक्रिय आहेत. दरम्यान पिंकविलाच्या अहवालानुसार, मलायकाचा पूर्वाश्रमीचा पती अरबाज खान आणि तिचा सध्याचा प्रियकर अर्जुन कपूर हे दोघे अरोरा सिस्टर्स या कार्यक्रमात एकत्र दिसणार आहेत, परंतु वेगवेगळ्या भागांमध्ये ते सहभागी होणार आहेत.