गंभीर आणि अष्टपैलू भूमिका करणारा अशी मनोज वाजपेयीची ओळख आहे. मनोजने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं असून आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना भूरळ पाडली आहे. पण, एका लहानशा खेडेगावातून आलेल्या मनोजसाठी शहरातील लाइफ नवी होती. अलीकडेच मनोजने तो पहिल्यांदा नाइट क्लबला गेला होता, तेव्हाचा अनुभव सांगितला.

Video: “खरं सांग ती गाडी दुसऱ्याची आहे ना?” ‘फँड्री’ फेम राजेश्वरी खरात ‘त्या’ व्हिडीओमुळे ट्रोल

‘कर्ली टेल्स’शी बोलताना मनोज बाजपेयीला तो काळ आठवला जेव्हा शाहरुख खान त्याला डिस्कोमध्ये घेऊन गेला होता. “खूप वर्षांपूर्वी दिल्लीत घुंगरू नावाचा नाईट क्लब होता आणि मी त्यावेळी चप्पल घातली होती. त्यावेळी शाहरुखने माझ्यासाठी शूज मागवले होते. मग मी क्लबच्या आत गेलो. ती लाइफ मी पहिल्यांदाच पाहिली होती. नाईट क्लब म्हणजे काय ते तेव्हा कळलं. हे लोक नाचत होते पण मी एका कोपऱ्यात वाइन पित उभा होतो,” असं मनोजने सांगितलं.

एका गाण्यासाठी रंगवलं अख्खं गाव; हेमंत ढोमेने सांगितला ‘सातारचा सलमान’ चित्रपटाचा किस्सा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाहरुख खान, बेनी आणि रामाने आपल्याला पहिल्यांदा नाइट क्लबला नेलं होतं, असा खुलासा मनोज वाजपेयीने केला. दरम्यान, मनोज लवकरच ‘गुलमोहर’ चित्रपटात दिसणार आहे. गुलमोहरमध्ये शर्मिला टागोर, सूरज शर्मा, अमोल पालेकर, कावेरी सेठ आणि सिमरन यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट ३ मार्च रोजी Disney+ Hotstar वर प्रदर्शित होणार आहे.