हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेला अभिनेता मनोज बाजपेयी हा विविध कारणांमुळे चर्चेत असतो. दर्जेदार अभिनयाने मनोजने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. ‘सत्या’मधला भिकु म्हात्रे ते ‘गँग्स ऑफ वासेपूर’मधील सरदार खान अशा वेगवेगळ्या भूमिका मनोज यांनी अजरामर केल्या आहेत. केवळ चित्रपटच नव्हे तर आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरही मनोज यांनी त्याच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.

मनोज बाजपेयी यांनी आजवर वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका केल्या आहेत. खासकरून त्यांचे चित्रपटही मुख्य प्रवाहातील चित्रपटांपेक्षा हटके होते. मनोज यांनी यश चोप्रासारख्या बड्या दिग्दर्शकाबरोबर फक्त एका चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. २००४ साली आलेल्या यश चोप्रा यांच्या ‘वीर जारा’ या चित्रपटात मनोज बाजपेयी यांनी प्रीती झिंटाच्या पतीची भूमिका निभावली होती.

shehzad-khan-speaks-about-ajit
“माझे वडील गटारात झोपायचे…”, बॉलिवूडचा कपटी खलनायक अजित यांच्या मुलाचा मोठा खुलासा
dwarka pm modi
प्राचीन द्वारका नगरीच्या दर्शनातून पंतप्रधान मोदींचा अहिर समुदायाला संदेश
actor shreyas talpade debut in south indian movie
बॉलीवूड गाजवल्यानंतर आता मराठमोळा श्रेयस तळपदे करणार दाक्षिणात्य चित्रपटात पदार्पण, म्हणाला…
sanjay-dutt-salman-khan
जेव्हा संजय दत्त व सलमान खान यांना घेऊन बनणार होती एक गे लव्हस्टोरी…; किस्सा जाणून घ्या

आणखी वाचा : विवेक अग्निहोत्री यांची प्रियंका गांधींवर खोचक टीका; म्हणाले “तुम्ही करण जोहरच्या चित्रपटात…”

या चित्रपटाच्या वेळी काम करतानाचा अनुभव कसा होता अन् एकूणच यश चोप्रा यांनी त्यांना ही भूमिका करण्यासाठी कशाप्रकारे राजी केलं याविषयी मनोज बाजपेयी यांनी खुलासा केला आहे. ‘ह्यूमन्स ऑफ बॉम्बे’ या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये मनोज म्हणाले, “शाहरुखला मी दिल्लीत असल्यापासून ओळखत होतो, त्यामुळे या चित्रपटाच्या निमित्ताने त्याच्याबरोबर वेळ घालवता येईल आणि यश चोप्रासारख्या मोठ्या दिग्दर्शकाच्या सेटवर वेळ घालवता येईल आणि बरंच काही शिकायला मिळेल त्यामुळे मी ही छोटी भूमिका स्वीकारली.”

सेटवर ४ ते ५ दिवस काम करताना यश चोप्रा आणि मनोज बाजपेयी यांच्यात बऱ्याच गप्पा व्हायच्या. याविषयी बोलताना मनोज म्हणाले, “आपण सगळेच त्यांचे चित्रपट बघत मोठे झालो आहोत. मी आणि यशजी आम्ही सेटवर खूप गप्पा मारायचो. त्यांनी मला एक गोष्ट स्पष्ट सांगितली होती की, मी ज्यापद्धतीचे चित्रपट करतो तसे चित्रपट मी स्वतः बनवत नाही, त्यामुळे पुढे भविष्यात आपल्याला काम करणं शक्य होणार नाही, पण ही जी भूमिका आहे ती खूप उत्तम आहे, तू जर ती स्वीकारलीस तर तिला योग्य न्याय मिळेल. यशजी फारच नम्र होते.”

आणखी वाचा : सामान्य गृहिणी अन् गुप्तहेराचा डॅशिंग अंदाज; राधिका आपटेच्या आगामी ‘मिसेस अंडरकव्हर’चा टीझर प्रदर्शित

मनोज बाजपेयी यांचा ‘गुलमोहर’ हा चित्रपट हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात मनोज बाजपेयीसह ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोरसुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. प्रेक्षकांनी या चित्रपटाचं प्रचंड कौतुक केलं आहे. याबरोबरच मनोज यांच्या ‘द फॅमिलीमॅन’ या वेबसीरिजच्या नव्या सीझनची सगळेच आतुरतेने वाट बघत आहेत.