Mika Singh shares anecdote on Salman Khan: मिका सिंग हा त्याच्या गाण्यांसाठी ओळखला जातो. आजवर त्याने बॉलीवूड चित्रपटांसाठी ‘जादू की झप्पी’, ‘फालतू’, ‘राणी तू मैं राजा’ अशी गाणी गायली आहेत. याबरोबरच मिका सिंग त्याच्या वक्तव्यांमुळेदेखील चर्चेत असतो.
मिका सिंग सलमान खानबद्दल काय म्हणाला?
मिका सिंगने नुकतीच शुंभकर मिश्राला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने सलमान खानबाबत वक्तव्य केले आहे. त्याने या मुलाखतीत बॉलीवूडच्या भाईजानचा एक किस्सा सांगितला आहे. तसेच, फक्त काही लोकांना माहीत आहे की सलमान खानबरोबर कधी संवाद साधला पाहिजे. दिवसातले काही विशिष्ट तास सलमान खानपासून दूर राहिले पाहिजे, कारण त्या काळात तो खात्रीने दुर्लक्ष करू शकतो, असाही खुलासा त्याने केला.
मिका सिंग म्हणाला, “सलमान खान रात्री वेगळा असतो आणि दिवसा वेगळा असतो. तो माझ्याबरोबर मनमोकळेपणाने गप्पा मारतो. दोन पेग प्यायल्यानंतर तो समान वागणूक देतो. पण, आपण दारू प्यायलो असू किंवा नसू आपण कोणताही भ्रम बाळगता कामा नये.
मी माझ्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात काही चुका केल्या आहेत, मी मूर्ख होतो. मी त्याचे पाय धरून त्याला विचारायला पाहिजे होते की मी तुझ्या चित्रपटांसाठी गाणी गाऊ शकतो का? तो ‘जानम समजा करो’च्या शूटिंगसाठी सेटवर होता. त्याने आमच्यासोबत चहाही घेतला. पण, त्याला संपर्क साधण्यासाठी मी नंबर मिळवू शकलो नाही. त्याने मला गाण्यास सांगितले. मी ज्या पद्धतीने गाणे गायले, त्यामुळे कदाचित माझ्याकडे त्याने कार्टून म्हणून बघितले असेल.”
सलमान खानने एकदा प्रसिद्ध गायक मीत ब्रदर्स यांना भेटण्यास नकार दिला होता. एका चित्रपटाच्या प्रीमिअरदरम्यान त्यांनी सलमान खानला भेटण्याचा प्रयत्न केला. पण, सलमान खानने त्यांना भेटण्यास नकार दिला. विशेष बाब म्हणजे, त्यांनी एक दिवस आधीच सलमान खानबरोबर जेवण केले होते. दुसऱ्या दिवशी ते ‘रेस ३’च्या प्रीमिअरला गेले. सलमान खान आला, त्यांच्याजवळून पुढे गेला. पण, त्याने त्यांना ओळखही दाखवली नाही. ते पाहून मीत ब्रदर्सना धक्का बसला होता. त्यांना माहीत नाही की सलमान खानला भेटण्याची योग्य वेळ कोणती आहे. सलमान खान दिवसा रागात असतो, संध्याकाळी ६ नंतर तो शांत असतो.
पुढे मिका सिंगने असेही सांगितले की, सलमान खान रात्री कोणत्याही वेळी फोन करतो. जर त्याला उत्तर दिले नाही तर त्याला राग येतो. माझ्या बाबतीतही हे झाले होते, असे म्हणत मिका सिंगने सलमान खानच्या स्वभाव व सवयींबद्दल सांगितले आहे.
दरम्यान, सलमान खानच्या कामाबद्दल बोलायचे तर नुकताच ‘सिंकदर’ या चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. या चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदानादेखील प्रमुख भूमिकेत दिसली. आता सलमान खान कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.