विराट कोहलीच्या प्रेमात आकंठ बुडाली होती मृणाल ठाकूर; अनेक वर्षांनी खुलासा करत म्हणाली, "तो मला..." | Mrunal thakur revealed that she was mad for virat kohli | Loksatta

विराट कोहलीच्या प्रेमात आकंठ बुडाली होती मृणाल ठाकूर; अनेक वर्षांनी खुलासा करत म्हणाली, “तो मला…”

अभिनेत्री मृणाल ठाकूर हिने तिच्या मनातलं विराट कोहलीबद्दलचं एक गुपित अनेक वर्षांनी उघड केलं आहे.

mrunal thakur

भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार विराट कोहली अत्यंत लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात त्याचा चाहता वर्ग पसरला आहे. त्याच्या खेळामुळे, लूक्समुळे, त्याच्या वागण्यामुळे अनेक जण त्याला आपला आदर्श मानतात. त्यातही त्याचे फिमेल फॅन फॉलोईंग भरपूर आहे. या त्याच्या चाहत्यांमध्ये अनेक अभिनेत्रींचाही समावेश आहे. अभिनेत्री मृणाल ठाकूर हिने तिच्या मनातलं विराट कोहलीबद्दलचं एक गुपित अनेक वर्षांनी उघड केलं आहे.

काही वर्षांपूर्वीपर्यंत मृणाल विराट कोहलीच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. नुकताच तिने ‘ई टाइम्स’ला दिलेल्या एका मुलाखतीत याचा खुलासा केला. मृणाल म्हणाली, “मला क्रिकेट हा खेळ प्रचंड आवडतो. या खेळाची आवड मला माझ्या भावामुळे लागली. शाळेच्या दिवसांमध्ये मी क्रिकेट खेळण्यात तरबेज होते. क्रिकेट बरोबरच मला फुटबॉल आणि बास्केटबॉल हे खेळदेखील आवडायचे. माझ्या शालेय दिवसांमध्ये मी काही मोठ्या स्पर्धांमध्येही खेळले आहे.

आणखी वाचा : “तुम्हाला लाज वाटत नाही का…?”; उर्फी जावेदचे समर्थन करत ऋतुजा सावंतने चेतन भगत यांना सुनावले खडे बोल

पुढे विराट कोहलीबद्दल बोलताना ती म्हणाली, “एक वेळ होती जेव्हा विराट कोहली मला खूप आवडायचा. मी त्याच्यासाठी वेडी होते. ५ एक वर्षापूर्वी मी माझ्या भावासोबत लाइव्ह मॅच पाहिली होती, ज्याच्या खूप चांगल्या आठवणी माझ्याकडे आहेत. मला आठवतंय मी निळी जर्सी परिधान केली होती आणि भारतीय टीमसाठी चिअर करत होते.”

हेही वाचा : मृणाल ठाकूरच्या ‘सिता रामम्’चं माजी उपराष्ट्रपतींकडून कौतुक, व्यंकय्या नायडू म्हणाले “प्रत्येकाने एकदा तरी…”

दरम्यान मृणाल तेलुगू चित्रपट ‘सीता रामम्’मध्ये दिसली. या चित्रपटात दुलकर सलमान आणि रश्मिका मंदाना देखील होते. याव्यतिरिक्त काही दिवसांपूर्वी मृणालचे ‘धमाका’ आणि ‘जर्सी’ हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले. ‘धमाका’मध्ये ती कार्तिक आर्यनबरोबर तर ‘जर्सी’मध्ये ती शाहिद कपूरबरोबर दिसली.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-11-2022 at 16:26 IST
Next Story
फोटोतील चिमुकल्याला ओळखलंत का? आज आहे बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता