‘सिता रामम’, ‘हाय नन्ना’ अशा चित्रपटांतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी मृणाल ठाकूर ही आताच्या घडीची लोकप्रिय अभिनेत्री आहे. बॉलिवूडमध्येही मृणालने स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘फॅमिली स्टार’ या आगामी चित्रपटातह मृणाल विजय देवरकोंडासह झळकणार आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत कपड्यांवर वायफळ खर्च करणं हे तिला व्यर्थ वाटत असल्याचं तिने म्हटलं आहे.

‘गलाटा प्लस’ला दिलेल्या मुलाखतीत मृणाल म्हणाली, “डिझायनर कपड्यांवर मला जास्त पैसे खर्च करायला आवडत नाहीत. कारण- जर ट्रेंड गेला तर ते पुन्हा वापरता येत नाहीत. तुम्ही ते परत घालणार नाही. “

मुलाखतीत घातलेल्या कपड्यांबद्दल विचारलं असता मृणाल म्हणाली, “हे माझे कपडे नाहीत. मी यांचा वापर फक्त प्रमोशन्ससाठी करते. या टॉपसाठी जास्तीत जास्त मी २ हजार रुपये खर्च केले आहेत आणि तेही मला जास्त वाटत आहेत.”

हेही वाचा… ‘नाच गं घुमा’ चित्रपटासाठी मानधन घेण्यास मुक्ता बर्वेने दिलेला नकार; लेखिका खुलासा करत म्हणाली…

मृणाल पुढे म्हणाली, “या महागातल्या गोष्टी जरी असल्या तरी तुम्ही त्या पुन्हा पुन्हा वापरू शकणार नाही. तुमच्याकडे क्लासिक कलेक्शन असायला हवं. पण ब्रॅंड आहे म्हणून कपडे घ्यायचे आणि आपले पैसे फुकट घालवायचे. यापेक्षा ते पैसे मी खाण्यात, घर घेण्यात, एखादं रोपटं लावण्यात, किंवा जमीन घेऊन त्यात शेती करण्यात खर्च करेन.”

हेही वाचा… “मन म्हणतंय नाच गं घुमा…” लेखिका मधुगंधा कुलकर्णीने सांगितली चित्रपटाच्या नावामागची रंजक गोष्ट

माध्यमांसमोर मृणाल अनेकदा डिझायनर आऊटफिट्समध्ये दिसली आहे. याबद्दल विचारलं असता अभिनेत्री म्हणाली, “मी चीट करते. जर माझ्या कपाटात हजार गोष्टी असतील तर त्यातल्या पाच गोष्टी तरी स्टेटमेंट पीस असतात. मी टॉप, जीन्स घालते आणि शूज, बॅग यासारख्या स्टेटमेंट गोष्टी बदलत राहते. या गोष्टींचा समावेश केल्याने मी नेहमी वेगळी आणि छान दिसते आणि महागडे कपडे खरेदी करण्याचीही गरज लागत नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मृणालच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, मृणाल ठाकूरचा आगामी चित्रपट ‘फॅमिली स्टार’ ५ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.