अभिनेत्री मृणाल ठाकूर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती तिचे फोटो व व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. पण अलीकडेच तिने शेअर केलेल्या काही बिकिनी फोटोंमुळे नेटकरी तिला ट्रोल करत आहेत. मृणालचे बिकिनीमधील फोटो चाहत्यांना फारसे रुचलेले दिसत नाहीयेत.

Video: अंबानी कुटुंबाच्या कार्यक्रमात शाहरुख खानचं गौरीशी जोरदार भांडण? ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

मंगळवारी मृणाल ठाकूरने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर काही फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये मृणाल ठाकूर समुद्र किनाऱ्यावर निळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये मस्ती करताना दिसत आहे. या फोटोंमध्ये मृणाल ठाकूर खूपच हॉट दिसत आहे.

मृणालचे हे बिकिनी फोटो मात्र नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरलेले दिसत नाहीत. या बिकिनी फोटोंमुळे मृणाल ठाकूर ट्रोल झाली आहे. ट्रोल्सच्या नाराजीचे कारण मृणाल ठाकूरचा सुपरहिट चित्रपट ‘सीता रामम’ आहे, ज्यामध्ये तिने सीता महालक्ष्मी या साध्या मुलीची भूमिका साकारली होती.

mrunal
मृणालच्या फोटोवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स

‘अशी अभिनेत्री जिला मला कधीच बिकिनीमध्ये बघायचं नव्हतं,’ अशी कमेंट एका युजरने केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
mrunal
मृणालच्या फोटोवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स

तसेच आणखी एका युजरने लिहिले आहे की, ‘लोक फॉलोअर्स वाढवण्यासाठी अंगप्रदर्शन करत आहेत, पण तुम्हाला माहिती नाही की ते टॅलेंट आणि कौशल्यानेही वाढवता येते,’ अशा प्रकारे लोक मृणाल ठाकूरला प्रचंड ट्रोल करत आहेत.