मुंज्या’ या हॉरर कॉमेडी चित्रपटातून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारा अभिनेता म्हणजे अभय वर्मा होय. ‘मुंज्या’ हा चित्रपट हिट ठरला आणि त्यामुळे बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारा व त्या चित्रपटात मुख्य भूमिकेत असणारा अभिनेता अभय वर्मा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरला. जरी अभयने कमी वयात इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले असले तरी त्याचा प्रवास सोपा नव्हता. एका मुलाखतीत कास्टिंग काऊचच्या अनुभवामुळे तो चित्रपटसृष्टी सोडून आपल्या गावी परतल्याची आठवण त्याने सांगितली आहे. सध्या त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

“… त्यानंतर मी बॅगा भरल्या आणि गावी गेलो”

अभय वर्माने ‘इंडिया टुडे’ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तरुण कलाकारांसाठी इंडस्ट्रीमध्ये स्वत:ची जागा निर्माण करणे किती अवघड आहे, याबद्दलचे वक्तव्य त्याने केले होते. त्याने म्हटले, “एक २६ वर्षांचा मुलगा त्याची स्वप्नं घेऊन निरागसतेसह इथे येतो आणि कल्पना करा पहिल्याच भेटीत त्याला असा अनुभव येतो की, समोरच्या व्यक्तीला तुमच्या कामात काहीही रस नाही. पण, त्याला तुमच्याकडून काही वेगळेच पाहिजे आहे. तो तुम्हाला तडजोड करण्याचा स्थितीत घेऊन जातो.”

अभय पुढे म्हणाला, “या इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवल्यानंतर माझी पहिली भेटच अत्यंत अस्वस्थ करणारी होती. त्यामुळे मी माझ्या बॅगा भरल्या आणि पुन्हा गावी गेलो. जगातील कोणत्याही व्यक्ती किंवा गोष्टीसाठी तुमच्या तत्त्वांशी, तुमच्या असलेल्या ओळखीशी कधीही तडजोड करू नका.”

हेही वाचा: रिअ‍ॅलिटी शोमध्ये पडले प्रेमात, तीन वर्षांनी सेलिब्रिटी जोडप्याने केली ब्रेकअपची घोषणा; म्हणाले, “आम्हाला एकमेकांबद्दल…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभय वर्माच्या कामाबद्दल बोलायचे, तर त्याच्या या अनुभवानंतर पुन्हा मुंबईत आला आणि त्याने ऑडिशन द्यायला सुरुवात केली. ‘लिटल थिंग्स’ आणि सफेद या टीव्ही मालिकांमध्ये सहायक भूमिका साकारण्याआधी त्याला ‘सुपर ३०’ या चित्रपटात एक लहान भूमिका मिळाली. ‘द फॅमिली मॅन’मध्ये तो नकारात्मक भूमिकेत दिसला होता. ‘ये मेरे वतन के लोंगो’ आणि ‘मुंज्या’ या चित्रपटांतून त्याला मोठा ब्रेक मिळाला.

दरम्यान, मुंज्या चित्रपटातून त्याला मोठी लोकप्रियता मिळाली. आता तो लवकरच शाहरुख खानबरोबर किंग या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात शाहरुखची लेक सुहाना खानदेखील दिसणार आहे. शाहरुख बरोबर काम करण्यास उत्सुक असल्याचे अभयने म्हटले आहे.