नवाजुद्दिन सिद्दिकी आणि त्याची पूर्व पत्नी आलिया सिद्दिकी यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. दोघांमधील वाद याआधी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता, परंतु सध्या नवाजुद्दिनची पत्नी आलिया वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. अलीकडेच आलिया सिद्दिकीने इन्स्टाग्रामवर एका मिस्ट्री मॅनबरोबरचा रोमॅंटिक व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी तिला प्रचंड ट्रोल केले होते. यानंतर आता आलियाने एका मुलाखतीदरम्यान या ‘मिस्ट्री मॅन’बरोबरच्या नात्याचा खुलासा केला आहे.

हेही वाचा- “जर पैसे हवे असतील तर…”; ट्विंकल खन्नाने आई डिम्पल कपाडियाला सुनावले होते खडे बोल!

आलियाने एका मुलाखतीत याबाबतचा खुलासा केला आहे. आलिया म्हणाली, “मी त्याचे नाव सांगणार नाही. मी त्याच्याबरोबर एक फोटोही सोशल मीडियावर अपलोड केला होता. मी त्याला एका मित्राच्या पार्टीत भेटले होते. “तो सतत माझ्याकडे बघत होता. मी त्याला आवडत होते, हे माझ्या लक्षात आलं होतं. मलाही तो आवडू लागला होता. तो अगदी शांतपणे एका कोपऱ्यात पाहुण्यांशी बोलत बसला होता. मला त्याचा चेहरा खूप आवडला. तो खूप सुंदर दिसायचा. मला भावनिक आधार देणारी व्यक्ती आहे.”

पार्टीत दोघे बोलला होता का? असा प्रश्न आलियाला विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली, “नाही, पार्टीत नाही. काही दिवसांनी आम्ही बोलू लागलो. त्याने माझ्या मित्राला माझा नंबर विचारला होता. माझ्या मित्राने मला याबाबत विचारले. मी म्हटले, नंबर देण्यासाठी होकार दिला. यानंतर मला त्याचा फोन आला.”

हेही वाचा- “घटस्फोट कधी घेतलास?” कार्तिक-कियाराचा ‘तो’ फोटो पाहून नेटकरी गोंधळले; अभिनेत्रीने डिलीट केली इन्स्टाग्राम पोस्ट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, नवाजुद्दिन आणि आलियामध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू आहेत. परंतु परस्पर संमतीनंतर अभिनेत्याने आलियावरील मानहानीचा खटलाही मागे घेतला असून सध्या दोघेही आपले वैयक्तिक आयुष्य जगत आहेत. आलिया सध्या दुबईत असून, नवाजुद्दिनचा ‘जोगीरा सा रा रा रा’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर म्हणावी तशी जादू दाखवू शकला नाही.