This Bollywood Actress Talks About Pregnancy Befor Marriage : कलाकारांच्या खासगी आयुष्याबद्दल अनेकदा बोललं जातं. त्यांच्या रिलेशनशिपबद्दल, लग्नाबद्दल, मुलांबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा होत असते. असंच काहीचं लोकप्रिय अभिनेत्रीबरोबर झालेलं. लग्नापूर्वी ती गरोदर असल्याने तिच्याबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा केली जात होती असं तिने सांगितलं आहे.
अभिनेत्रीने आता तिच्या खासगी आयुष्यातील त्या प्रसंगाबद्दल सांगत त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ही अभिनेत्री म्हणजेच नेहा धुपिया. नेहा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते व अनेकदा वेगवेगळ्या गोष्टींबद्दलची तिची मतं स्पष्टपणे मांडत असेत. अशातच तिने तिच्या खासगी आयुष्यात आलेल्या अनुभवाबद्दल सांगितलं आहे.
नेहाने तिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगताना यावर तिची प्रतिक्रियासुद्धा दिली आहे. ती लग्नापूर्वी गरोदर होती त्यामुळे नेहा व तिच्या नवऱ्याबद्दल चर्चा केली जायची. याबद्दल तिने सांगितलं आहे. ‘मिड डे’सह संवाद साधताना तिने सांगितलं की, “मी अंगदबरोबर लग्न केल्यानंतर ६ महिन्यांनी आमच्या लेकीचा जन्म झाला. पण त्यावेळी सर्वत्र आमच्या लग्नाबद्दल बोललं जात होतं. की, लग्नानंतर फक्त ६ महिन्यातच मूल कसं झालं?”
नेहा पुढे म्हणाली, लग्नापूर्वी गरोदर राहणारी ती पहिली स्त्री नाहीये. ती म्हणाली, “मी हल्ली लग्नापूर्वी या अभिनेत्री गरोदर होत्या अशा गोष्टी सोशल मीडियावर बघते तेव्हा मला वाटतं की निदान मी नीना गुप्ता व आलिया भट्ट यांच्या यादीत आहे. पण ही खूप वाईट गोष्ट आहे.”
अभिनेत्री म्हणाली, “कोणाला ही असे प्रश्न विचारण्याचा अधिकार नाहीये. मातृत्व खूप सुंदर भावना आहे. तिने सांगतिलं की, “गरोदरपणाविषयी, मातृत्वाबद्दल, त्यानंतरच्या प्रवासाबद्दल बोलण्याकरता स्त्रीयांसाठी माध्यम असायला हवं.या गोष्टींकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. याबद्दल बोल्यामुळे जर माझ्यावर टीका होणार असेल आणि कोणाला वाईट वाटणार असेल तरीसुद्धा मी बोलणारच आहे.”
अभिनेत्री नेहा धुपियाने अंगद बेदीबरोबर २०१८ साली लग्न केलं होतं. नेहाने मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे लग्नाच्या ६ महिन्यांनी त्यांच्या मुलीचा मेहरचा जन्म झाला. त्यांची मुलगी आता ७ वर्षांची झाली असून या जोडप्याला आता ३ वर्षांचा एक मुलागा देखील आहे.
नेहा धुपियाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने मॉडल म्हणून काम करायला सुरुवात केली होती. त्यानंतर तिने सिनेमातही काम केलं आहे. छोट्या पडद्यावरील कार्यक्रमांचं तिने सूत्रसंचालन केलं आहे. लवकरच ती एका आगामी सीरिजमधून ओटीटीवर पदार्पण करणार आहे.