अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक पलक तिवारी तिचा डेब्यू चित्रपट किसी का भाई किसी की जानमधील अभिनयामुळे चर्चेत आहे. श्वेता तिवारीने दोन लग्नं केलीत, त्यापैकी तिच्या पहिल्या पतीपासून पलक ही मुलगी झाली होती. राजा चौधरीपासून विभक्त झाल्यानंतर श्वेताने अभिनव कोहलीशी लग्न केलं होतं. अभिनवपासून तिला रेयांश नावाचा मुलगा आहे. सध्या श्वेता सिंगल मदर आहे.

Video : “परिणीती भाभी जिंदाबाद”! राघव चड्ढाबरोबर IPLचा सामना पाहण्यासाठी परिणीती मैदानात, चाहत्यांनी दिल्या घोषणा

आई श्वेता तिवारी दुसऱ्यांदा आई होणार आहे हे कळल्यावर पलकला कसं वाटलं होतं, याचा खुलासा पलकने नुकताच केला आहे. पलकने सांगितलं की जेव्हा तिला पहिल्यांदा तिच्या आईच्या दुसऱ्या गरोदरपणाबद्दल कळालं तेव्हा तिला काहीच समजलं नव्हतं. ‘फिल्म कंपेनियन’शी बोलताना पलक म्हणाली, “मला आठवतंय त्यावेळी मी १५ वर्षांची होते. माझी आई मला म्हणाली, आम्हाला बाळ होणार आहे. तर मी मान हलवत ‘नाही, नाही, नाही’ असं म्हणाले. तू नाही का म्हणतेस, असं आईने मला विचारलं. त्यावर मी म्हणाले, मी नवीन सदस्याच्या घरात येण्याबद्दल तयार नव्हते. मला कुणीच सांगितलं नाही. माझं वागणं पाहून आई म्हणाली ‘तुझी ओव्हरअॅक्टिंग बंद कर.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, श्वेता तिवारीने १९९८ मध्ये राजा चौधरीशी लग्न केलं होतं. त्यानंतर २००० मध्ये पलकचा जन्म झाला, पलकला श्वेताने एकटीने वाढवलं, त्यानंतर तिने २०१२ मध्ये पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतला व २०१३ मध्ये अभिनव कोहलीशी लग्न केलं. पण तिचं दुसरं लग्नही फक्त ९ वर्षे टिकलं. श्वेताने २०२२ मध्ये अभिनवपासून घटस्फोट घेतला व आता ती एकटीच पलक व मुलगा रेयांशचा सांभाळ करत आहे.