अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक पलक तिवारी गेले काही दिवस तिच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आहे. बॉलीवूड पदार्पणाच्या आधीपासूनच विविध कारणांमुळे सर्वांचं लक्ष तिच्याकडे वेधले जात होतं. तिच्या बाबतीतली प्रत्येक गोष्ट चर्चेत आली आहे. आता तिने तिची आई श्वेता तिवारीबद्दल एक मोठं वक्तव्य केलं आहे.

गेले काही दिवस ती ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाच्या निमित्ताने विविध मुलाखती देत आहे. तर आता नुकतीच तिने ‘मिड डे’ला एक मुलाखत दिली आणि त्यात तिने तिची आई श्वेता तिवारीशी असलेल्या नात्यावर भाष्य केलं. त्या दोघींमधील असलेला बॉंडिंग शेअर करताना तिने अनेक धक्कादायक खुलासे केले.

आणखी वाचा : “प्रत्येक पार्टीत आर्यन…” पलक तिवारीचा शाहरुख खानच्या लेकाबद्दल मोठा खुलासा

पलक म्हणाली, “मी जर सलमान खानच्या चित्रपटांमध्ये काम करते आहे हे माझ्या आईला माहित नसतं तर तिने माझ्यावर बारीक नजर ठेवली असती. पण मी सलमान खानच्या चित्रपटांमध्ये त्यांच्याबरोबर काम करते आहे हे कळल्यावर ती निश्चिंत झाली. आई आणि माझ्यामध्ये ५०-५० टक्के प्रेम आहे असा अजिबात म्हणता येणार नाही. ते एकतर्फी आहे. मी तिचा कायम विचार करत असते. अनेक गोष्टींमध्ये ती मला खूप सहन करते. तिला ते करावं लागतं कारण ती माझी आई आहे. मी तिला दिवसातून किमान ३० वेळा तरी फोन करते. पण ती त्यातल्या अनेक फोनकडे दुर्लक्ष करते.” आता तिचं हे बोलणं खूप चर्चेत आलं आहे.

हेही वाचा : “प्रमोशनदरम्यान मी…” शहनाज गिलने पलक तिवारीने केलेल्या ड्रेस कोडच्या वक्तव्यावर दिलेली प्रतिक्रिया चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पलकची आई श्वेता तिवारीला ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेतील ‘प्रेरणा’ या भूमिकेमुळे स्वतंत्र ओळख मिळाली. ‘झलक दिखला जा’, ‘खतरों के खिलाडी’,आणि ‘बिग बॉस ४’ अशा विविध रिॲलिटी शोमध्येही ती झळकली. सध्या ती ‘मैं हू अपराजिता’ या मालिकेत आईची व्यक्तिरेखा साकारत आहे.